दमदार माजी आमदार राम सातपुते यांची माळशिरस तालुक्यात कमळ फुलवण्याची मुहूर्तमेढ अकलूज येथून रोवली जाणार…
माळशिरस तालुक्यात आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे कमळ फुलवण्यासाठी अकलूजच्या विजय चौकातील मुहूर्त ठरला….
अकलूज (बारामती झटका)
अकलूजचे ग्रामदैवत अकलाई देवीच्या पावन भूमीत श्री संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या अकलूज येथून माळशिरस तालुक्यात कमळ फुलविण्याची भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी दि. ०२ डिसेंबर २०२४ रोजी मुहूर्तमेढ रोवण्याचा निश्चय केलेला आहे. माळशिरस तालुक्यात आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे कमळ फुलविण्यासाठी अकलूजच्या विजय चौकातून मुहूर्त ठरलेला आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत निसटता पराभव झाल्यानंतर जय-पराजयाची तमा न बाळगता सायंकाळच्या चिंतन मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, नगर पंचायत, बाजार समिती, साखर कारखाना या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे कमळ चिन्ह घेऊन कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे अभिवचन दिलेले होते. त्याप्रमाणे राम सातपुते यांनी निकालाला आठ दिवस सुद्धा झालेले नाहीत तोपर्यंत, अकलूज येथे भारतीय जनता पक्षाच्या शाखांचे उद्घाटनाचे आयोजन केलेले आहे. उद्या सकाळी साडेनऊ वाजता विजय चौक, आंबेडकर चौक, होनमाने प्लॉट, समता नगर, पंचवटी, अकलूज येथे शाखांचे उद्घाटन करून पंचवटी अकलूज येथे शाखा उद्घाटनाची सांगता सभा संपन्न होणार आहे.
महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार स्थापन होत आहे. राम सातपुते यांनी चिंतन मेळाव्यामध्ये सांगितलेले होते, सर्वसामान्य व गोरगरीब जनतेची सेवा करण्याकरता माळशिरस तालुक्यातच राहणार आहे. केंद्रात व राज्यात भाजपच्या विचाराचे सरकार असल्याने आगामी निवडणुका महायुतीच्या घटक पक्षातील नेते, कार्यकर्ते व पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन माळशिरस तालुक्यात एका विचाराची सत्ता आणण्याचा संकल्प केलेला होता. तोच संकल्प मार्गशीर्ष महिन्यातील पहिला मंगळवार आणि तोही अकलूजचे ग्रामदैवत आई अकलाई मातेच्या पावनभूमीत सुरुवात करीत असल्याने तालुक्यातील जुलमी सत्तेला सुरुंग लावण्याकरता तालुक्यातील निष्ठावान कार्यकर्ते व मतदार यांच्या आशीर्वादाने भविष्यातील राजकीय वाटचाल पुढे राहील, असा विश्वास कार्यकर्त्यांना आलेला असल्याने माळशिरस तालुक्यात भारतीय जनता पक्षाचे जाळे गावोगावी वाड्यावर निर्माण होऊन निश्चितपणे माळशिरस तालुक्यात क्रांती घडणार आहे. या क्रांतीचे शिलेदार होण्याकरता निष्ठावानांची खरी गरज आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Glue Dream strain I just like the helpful information you provide in your articles