ताज्या बातम्यामनोरंजनसामाजिक

डान्सक्विन स्वाती देव आणि चॉकलेट हिरो सुरेश साळुंकेंमुळे थिरकला जेष्ठ नागरिकांचा नृत्यमंच

बीड (बारामती झटका)

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद शाखा बीड आणि नाट्यशास्त्र विभाग, सौ. के. एस. के. महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने “संधीकाली या अशा, धुंदल्या दिशा दिशा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात एकोणिसशे पंचाहत्तर ते ऐंशीच्या काळात मेळ्यामध्ये डान्स क्विन आणि चॉकलेट हिरो म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्वाती देव आणि निवेदक सुरेश साळुंकेंनी १९५७ साली गाजलेल्या नया दौर या दिलीप
कुमार आणि वैजयंती माला वर चित्रित केलेल्या अजरामर गाण्यावर अतिशय रोमॅन्टीकपणे डान्स करून कार्यक्रमात रंगत आनली.

या सदाबहार रोमॅन्टीक डान्सची कोरिओग्राफी खुद्द चॉकलेट हिरो निवेदक सुरेश साळुंके यांनी केली. गाण्यातल्या बारीक बारीक रोमॅन्टीक, मिष्किल जागा निवेदक सुरेश साळुंकेंनी रोमॅन्टीकपणे भरल्या तर तीतक्याच ताकतीने डान्स क्विन स्वाती देव यांनी मुक्तपणे केल्या. “उड़े जब जब जुल्फें तेरी” या गीततील प्रत्येक शब्दागणिक बदलणारे रोमॅन्टीक, मिष्किल, खोडकर एक्स्प्रेशन दोघांनी दिल्यामुळे डान्सची उंची वाढवणारे होते. म्हणूनच थिएटरमध्ये टाळ्या शिट्या वाजवून प्रतिसाद दिला जात होता.

कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पाटोदा, गेवराई, अंबाजोगाई येथुन जेष्ठ नागरिक कलावंत उपस्थित होते. डॉ. सौ. सारिकाताईं क्षीरसागर, प्राचार्य शिवानंद क्षीरसागर, उपप्राचार्य डॉ. संजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. दीपाताईं क्षीरसागर यांच्या शुभहस्ते उद्घाटन झाले.

कार्यक्रमांचे नियोजन आणि सूत्रसंचालन नाट्यशास्त्र विभागातील डॉ. दुष्यंता रामटेके आणि इतिहास विभाग प्रमुख डॉ. अनिता शिंदे यांनी केले. त्यांना संगीत विभागातील डॉ. राहुल सोनवणे, प्रा. दीपक जमधाडे,
प्रा. सुरेश थोरात, प्रा. इंद्रजीत भांगे, प्रा. पवन शिंदे, नाट्यशास्त्र विभागातील डॉ. विजय राख, या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक, रसिक जण मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

जेष्ठ नागरिक कलावंत कला सादर करताना डॉ. दीपाताई क्षीरसागर कार्यक्रमाचा आनंद घेतघेत आपल्या मोबाईलमध्ये फोटो हि काढत होत्या. हि त्यांची रसिकता पाहून कलावंत आनंदून गेले होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom