Uncategorizedकृषिवार्ताताज्या बातम्या

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी मदनसिंह मोहिते पाटील तर उपसभापती पदी मामासाहेब पांढरे यांची बिनविरोध निवड

अकलूज (बारामती झटका)

अकलूज ता. माळशिरस येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी चौथ्यांदा मदनसिंह मोहिते पाटील तर उपसभापतीपदी दुसऱ्यांदा बापूराव ऊर्फ मामासाहेब पांढरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी एम. एल. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत सभापती, उपसभापती निवड प्रक्रिया पार पडली‌. या प्रक्रियेत सभापती पदासाठी मदनसिंह मोहिते पाटील तर उपसभापती पदासाठी बापूराव पांढरे यांचे एकमेव अर्ज दाखल झाले होते. सभापती पदासाठी शहाजीराव उर्फ बाबाराजे देशमुख यांनी सूचना मांडली व बाळासाहेब माने देशमुख यांनी अनुमोदन दिले तर उपसभापती पदासाठी लक्ष्मण पवार यांनी सूचना मांडून संदीप पाटील यांनी अनुमोदन दिले. दोन्ही पदासाठी एक एकच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी शिंदे यांनी बिनविरोध निवड जाहीर केली.

यावेळी शहाजीराव मुधोजीराव देशमुख, भानुदास यशवंत राऊत, बाबुराव शंकरराव कदम, बाळासो गुलाबराव माने देशमुख, लक्ष्मण आगतराव पवार, मारूतराव नाथा रुपनवर, संदीप शामदत्त पाटील, शिवाजी चंद्रकांत चव्हाण, नितीन अशोक सावंत, मेघा सचिन साळुंखे, अमृता सुधीर सुरवसे, पोपट रंगनाथ भोसले, उत्तम शिवदास जानकर, आनंद अशोक फडे, महावीर मगनलाल गांधी, उद्धव निवृत्ती डांगरे, सचिन राजेंद्र काकडे विविध सोसायटीचे चेअरमन, सरपंच व पदाधिकारी तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button