ताज्या बातम्याराजकारण

माढा आणि पाडा’ अशी स्लोगन भाजप व महायुतीने माढा लोकसभा मतदारसंघात केलेली आहे…

‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महाविकास आघाडीत “ग्यानबाची मेख” मारली…

माळशिरस (बारामती झटका)

देशाच्या चौदाव्या लोकसभेसाठी निवडणूक जाहीर झालेली आहे. महाराष्ट्रात 48 लोकसभा मतदार संघ आहेत. त्यामध्ये अनेक चर्चेचे मतदार संघ आहेत. अशा देशात व राज्यात चर्चेत असणाऱ्या माढा लोकसभा मतदार संघात भाजप व महायुतीचे शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघात विरोधी असणाऱ्या महाविकास आघाडीत ‘ग्यानबाची मेख’ मारली आहे. माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून कोणीही उभा राहा आणि पराभवाला सामोरे जावा, अशी स्थिती निर्माण झालेली आहे. भाजप व महायुतीमधून ‘माढा आणि पाडा’ अशी स्लोगन माढा लोकसभा मतदारसंघात निर्माण झालेली आहे.

माढा लोकसभा मतदार संघात सातारा जिल्ह्यातील फलटण, माण-खटाव मतदार संघ व इतर जिल्ह्यातील काही गावांचा समावेश आणि सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला, माढा, करमाळा मतदार संघासह पंढरपूर तालुक्यातील गावांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षीय उलथापालन झालेली असून शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार यांच्याकडे आहे. यांनी भाजप व महायुती सोबत लोकसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतलेला असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळालेली आहे. महायुती व महाविकास आघाडी असा सामना महाराष्ट्रामध्ये रंगणार आहे.

बहुचर्चित माढा लोकसभा मतदार संघात भाजप व महायुतीने पुनश्च लोकसभेची उमेदवारी कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना दिलेली आहे. उमेदवारी देण्यापाठीमागे गेल्या पाच वर्षांमध्ये मतदारसंघातील सिंचन, रस्ते, रेल्वे व अनेक प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या माध्यमातून मतदार संघामध्ये रखडलेले प्रश्न मार्गी लावलेले आहेत. राजकीय समीकरणाचा सारासार विचार करून पुनश्च लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे.

भाजप व महायुतीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर पूर्वी महायुतीमध्ये असणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री महादेवरावजी जानकर महायुतीतून बाहेर पडण्याच्या मानसिकतेमध्ये होते, याचाच फायदा महाविकास आघाडी घेईल अशी शंका राजकारणातील चाणक्य असणारे देवेंद्रजी फडवणीस व अजितदादा पवार यांनी ओळखून माढा व परभणी लोकसभेसाठी इच्छुक असणारे महादेवरावजी जानकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा परभणी मतदार संघ देऊन महाविकास आघाडीची हवाच काढून घेतलेली आहे.

सोलापूर जिल्ह्याचे पालकत्व भाजपकडून देवेंद्रजी फडवणीस व राष्ट्रवादीकडून अजितदादा पवार यांच्याकडे असल्याने माढा व सोलापूर लोकसभा निवडून आणण्याची विशेष काळजी या दोघांवर आहे. माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघात पुन्हा कमळ फुलणार आहे. महाविकास आघाडीच्या गळाला महादेवराव जानकर लागले असते तर माढा लोकसभेसह इतर लोकसभा मतदारसंघात अडचणी निर्माण झाल्या असत्या. याचाच सारासार विचार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महाविकास आघाडीत ग्यानबाची मेख मारलेली आहे.

माढा लोकसभेत महायुतीला तगडे आवाहन देणारे महादेवराव जानकर एकमेव उमेदवार होते. सध्या महाविकास आघाडीकडे मतदारसंघात तुल्यबळ उमेदवार नसावा, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. अनेकजण इच्छुक आहेत मात्र, सोलापूर जिल्हा उमेदवारीची वाट पाहत आहे. सदरची उमेदवारी मिळावी यासाठी महाविकास आघाडीच नव्हे तर भाजप व महायुतीने सुद्धा देव पाण्यात ठेवलेले आहेत. नाव मोठं लक्षण खोटं, अशी अवस्था माढा लोकसभा मतदारसंघात निर्माण झालेली आहे. सोलापूर जिल्ह्यातील विरोधक पुन्हा एकवटलेले पाहावयास मिळणार आहेत. दूध का दूध आणि पाणी का पाणी लवकरच होणार आहे. वेट अँड वॉच आमचं सुद्धा ठरलंय, भाजप व महायुतीचे नेते व कार्यकर्ते ठणकावून सांगत आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort