देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून गाव चलो अभियानाला उदंड प्रतिसाद.

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी केली गाव चलो अभियानाला फडतरी गावाची निवड..
माळशिरस (बारामती झटका)
भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून गाव चलो अभियान सुरू आहे. ठीकठिकाणी या अभियानाला उदंड प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रामध्येही भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी गाव चलो अभियानामध्ये मतदार संघातील एका गावाची निवड करीत आहेत.
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी गाव चलो अभियानामध्ये माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील फडतरी गावाची निवड केलेली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सर्वसामान्य व तळागाळातील जनतेसाठी केलेल्या कामाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवून शेवटच्या घटकाला लाभ मिळावा, गावातील लोकांच्या घरोघरी जाऊन सुसंवाद साधून महत्त्वपूर्ण घेतलेले निर्णय राम मंदिर अशा अनेक गोष्टींचा अभियानामध्ये प्रचार व प्रसार केला जाणार आहे.


लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील शिखर शिंगणापूरच्या पायथ्याला वसलेले दुर्गम भागातील दुष्काळी गाव असणारे फडतरी गावाची निवड करून पंचक्रोशीतील अडीअडचणी, समस्या व जनतेशी हितगुज साधून आजचा मुक्काम गावामध्येच राहणार आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.