देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यतीच्या प्रेक्षणीय थराराचा आनंद घेण्यासाठी महिलांनी अवश्य उपस्थित राहावे – सौ. संस्कृतीताई राम सातपुते

पुरंदावडे (बारामती झटका)
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त श्री महालक्ष्मी ग्रामविकास प्रतिष्ठान पुरंदावडे सदाशिवनगर यांच्यावतीने बुधवार दि. 05/03/2025 रोजी देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यतीच्या प्रेक्षणीय थराराचा आनंद घेण्यासाठी महिलांनी अवश्य उपस्थित राहावे, असे सामाजिक कार्यकर्त्या सौ. संस्कृतीताई राम सातपुते यांनी महिलांना आवाहन केलेले आहे.

महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस विधानसभा मतदार संघात विकासकामांचा डोंगर व सर्वसामान्य व गोरगरीब जनतेचा संपर्क यामधून भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार तत्कालीन आमदार राम सातपुते यांनी सर्वसामान्य व गोरगरीब जनतेशी नाळ जोडलेली आहे. पुरुषांबरोबर महिलांना सुद्धा स्वतंत्र हक्काचे व्यासपीठ असावे यासाठी आमदार पत्नी सौ. संस्कृतीताई राम सातपुते यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये महिलांचे संघटन करून हळदीकुंकू व इतर सार्वजनिक कामातून महिलांच्या संपर्कात राहून महिलांशी व्यक्तिगत एक नाते निर्माण केले होते. संस्कृतीताई यांचा सुसंस्कृत व सोज्वळ स्वभाव यामुळे तालुक्यातील महिलांमध्ये आपलेपणा व आदर निर्माण झालेला आहे.

संस्कृतीताई यांनी समाजामध्ये वावरत असताना आमदाराची पत्नी म्हणून कधीच आपल्या वागण्यामध्ये जाणून दिले नाही. त्यामुळे अनेक जाती धर्मातील महिलांना आपल्या कुटुंबामधीलच संस्कृतीताई आहेत, अशी आपुलकीची व जिव्हाळ्याची नाती निर्माण केलेली आहेत. गतवर्षी आमदार केसरी बैलगाडी शर्यतीमध्ये माळशिरस तालुक्यात पहिल्यांदाच प्रेक्षकांना गॅलरी मधून बैलगाडी शर्यत पाहण्याचा योग जुळवून आणलेला होता. विशेष म्हणजे महिलांची स्वतंत्र व्यवस्था केलेली होती. पहिल्यांदा महिला बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी उपस्थित राहिलेल्या होत्या. तीच परंपरा देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यतीमध्ये महिलांना स्वतंत्र गॅलरीची सोय केलेली आहे. महिलांनी सुद्धा बैलगाडी शर्यतीच्या प्रेक्षणीय थराराचा अनुभव घेण्यासाठी महिलांनी अवश्य उपस्थित राहावे, मी येते तुम्हीही या असे महिलांना सामाजिक कार्यकर्त्या सौ. संस्कृतीताई राम सातपुते यांनी आवाहन केलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.