देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री; उद्या संध्याकाळी महायुतीचा शपथविधी
मुंबई (बारामती झटका)
भाजपने मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित केलंय. त्यांच्या नावाला आज सकाळी निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी या निरीक्षकांच्या उपस्थितीत विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मंजुरी दिली गेली आहे.
महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आलाय. महायुती सत्ता स्थापनेचा दावा आज करणार आहेत. फडणवीस उद्या संध्याकाळी पाच वाजता मुख्य मंत्रिपदाची तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस यापूर्वी दोनदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. प्रत्येक वेळी त्यांनी मोठे आव्हान स्वीकारून पक्षाला प्रत्येक टप्प्यावर विजयाकडे नेले. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी युवा नगरसेवक म्हणून राजकारणात प्रवेश केला होता.
देवेंद्र फडणवीस 2014 मध्ये जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांनी राष्ट्रवादी-काँग्रेसची 15 वर्षांची सत्ता संपवली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात झालेल्या सिंचन घोटाळ्याबाबत फडणवीस यांनी आवाज उठवला. मोदी लाटेत प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीचे कापड विणले आणि विजयी झाले. दुसऱ्यांदाही त्यांनी आघाडीसोबत बहुमत मिळवले, पण सत्ता मिळवता आली नाही. 72 तासांचे सरकार स्थापन करताना त्यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केली होती.
अवघ्या अडीच वर्षानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे दोन तुकडे झाले. देवेंद्र फडणवीस यांनी भाजपला पुन्हा सत्तेत आणलं. 2024 मध्ये फडणवीसांनी पुन्हा आपली रणनीती आखली. या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भाजपने सर्वाधिक जागा जिंकत केवळ महायुतीने बहुमत मिळवलं नाही, तर इतिहास देखील रचला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विश्वासू नेत्यांच्या यादीत देवेंद्र फडणवीस यांचं नाव पहिल्या काही नावांमध्ये येते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
gluco6 reviews : https://gluco6reviews.usaloves.com/
gluco6 reviews : https://gluco6reviews.usaloves.com/
gluco6 reviews : https://gluco6reviews.usaloves.com/
gluco6 reviews : https://gluco6reviews.usaloves.com/