ताज्या बातम्याराजकारण

देवेंद्रजी फडणवीस यांचा आशीर्वादाचा हात, रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या मैत्रीची साथ घेऊन स्वकर्तुत्वाने घडलेले नेतृत्व म्हणजे ना. जयाभाऊ गोरे.

ग्रामविकास खात्याची जबाबदारी अनेक दिग्गज नेत्यांनी सांभाळली तीच जबाबदारी घेऊन माणदेशी ढाण्यावाघ नागपूरला आमदार म्हणून गेले आणि नामदार म्हणून आले….

म्हसवड (बारामती झटका)

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व अनेक पक्ष व आघाड्या यांनी मिळून महायुती तयार झालेली होती. महायुतीने दैदीप्यमान यश संपादन केल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शपथविधी धुमधडाक्यात व मोठ्या उत्साही वातावरणात पार पडलेला होता. त्यानंतर नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील 33 कॅबिनेट मंत्री व 06 राज्यमंत्री यांचा शपथविधी पार पडल्यानंतर खातेवाटप झालेले आहे. ग्रामविकास खात्याची जबाबदारी अनेक दिग्गज नेत्यांनी सांभाळली तीच जबाबदारी घेऊन मानदेशी ढाण्या वाघ नागपूरला आमदार म्हणून गेले आणि नामदार म्हणून परत मतदार संघात आलेले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या आशीर्वादाचा हात व माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या मैत्रीची साथ घेऊन स्वकर्तुत्वाने घडलेले नेतृत्व म्हणजे जयकुमार उर्फ जयाभाऊ गोरे आहेत.

जयाभाऊ गोरे यांचा सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्म झालेला आहे. कोणताही राजकीय वारसा नसताना स्वकर्तुत्वाने खडतर असा राजकीय प्रवास केलेला आहे. 2007 साली जिल्हा परिषद आंधळी गटातून सदस्य झाले. त्याच वेळी जिल्हा नियोजन समिती सातारा येथे सदस्य झालेले होते. कार्याची जिल्हा परिषद सदस्य असताना चुणूक दाखवलेली होती. त्यानंतर माण-खटाव विधानसभा मतदार संघामध्ये 2009 साली विजय मिळवून पहिल्यांदा विधानभवनामध्ये गेलेले होते. त्यानंतर 2014 च्या निवडणुकीत पुन्हा विजयी झालेले होते. 2015 साली सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक झालेले होते. 2019 साली पुन्हा विधानसभा सदस्य झालेले होते. सन 2022 मध्ये सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष पदी विराजमान झालेले होते. पुन्हा विधानसभा निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलत असताना आमदार जयाभाऊ गोरे आणि युवा नेते शेखरभाऊ गोरे यांच्यामध्ये मनोमिलन करण्यात पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यशस्वी झालेले होते. शेखरभाऊ यांच्या मनोमिलनाने विक्रमी मताने जयाभाऊ विजयी झालेले होते. अनेक वर्षांचा दोन भावांचा राजकीय संघर्ष मिटवण्यामध्ये पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा सिंहाचा वाटा होता.

जयाभाऊ गोरे आणि रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांची राम लक्ष्मणासारखी जोडी सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या शक्तींना लढा देत होती. कायम सुखदुःखात व अडीअडचणीत एकमेकांना कायम साथ दिलेली आहे. त्यांची मैत्री महाराष्ट्रात सुपरीचित आहे. त्यांच्या समवेत दौंडचे आमदार राहुल कुल हे सुद्धा कायम असत. महाराष्ट्राच्या राजकारणात त्रिमूर्ती कायम एकत्र राहत असत. त्यांना खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कायम साथ देत राजकीय आधार व पाठबळ दिले आहे. मंत्रिमंडळामध्ये स्थान देताना सुद्धा देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे शिफारस करण्याकरता रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा सिंहाचा वाटा आहे. खातेवाटप करीत असताना नामदार जयाभाऊ गोरे यांच्याकडे ग्रामविकास व पंचायत राज खात्याची जबाबदारी आलेली आहे.

ग्रामीण विकास खात्याची जबाबदारी अनेक दिग्गज नेत्यांनी सांभाळलेली आहे. धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे, महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर. आर. आबा पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, सध्याच्या कॅबिनेट मंत्री पंकजाताई मुंडे अशा दिग्गज नेत्यांनी ग्रामविकास खात्याची जबाबदारी सांभाळलेली होती. तीच जबाबदारी घेऊन मानदेशी ढाण्यावाघ नागपूरला आमदार म्हणून गेले आणि मतदार संघात नामदार म्हणून येत आहेत. सातारा जिल्ह्यात मतदार संघामध्ये स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button