धक्कादायक बातमी : शिवामृत दूध उत्पादक संघाचे कार्यकारी संचालक रविराज इनामदार यांना अटक वॉरंट जारी…..

अकलूज (बारामती झटका)
माढा लोकसभेचे खासदार तथा शिवामृत दूध उत्पादक संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील यांच्या शिवामृत दूध उत्पादक संघ मर्यादित विजयनगर अकलूज तर्फे कार्यकारी संचालक रविराज शंकरराव इनामदार रा. विजयनगर, पो. यशवंतनगर, ता. माळशिरस यांना माळशिरस प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी मेहरबान जी. एम. बिरादार यांनी पकड वाॅरंट माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी अटक वॉरंट जारी केलेले आहे.
आरोपी शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघ मर्यादित विजयनगर अकलूज तर्फे कार्यकारी संचालक रविराज शंकरराव इनामदार यांचे वर STC 177/2023 मधील NT ACT-138 या अपराधाचा आरोप झालेला आहे. तुम्ही सदरहू आरोपी धरून माझ्यापुढे आणावे असा तुम्हास या वॉरंटद्वारे हुकूम केला आहे. यात लिहिल्याप्रमाणे करण्यात तुम्ही चूक करू नये, असे मेहरबान न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग जी. एम. बिरादार कोर्ट नंबर 3 माळशिरस यांचे न्यायालयातून दि. 18/06/2023 पकडण्याचे रोजी वाॅरेट निघालेले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



