धक्कादायक प्रकार : नातेपुते येथील नोकर भरतीत नोकरीचा आईचा… घो झाल्याचा प्रकार…
शिक्षण आयुक्त यांना शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी दिलेल्या सुनावणी इतिवृत्तांत पुन्हा उकरणे गरजेचे…
नातेपुते (बारामती झटका)
महाराष्ट्राच्या राजकारणात प्रस्थापितांनी शिक्षण संस्था, साखर कारखाने, दूध संस्था, कृषी उत्पन्न बाजार समिती, बँका, पतसंस्था यांच्या माध्यमातून राजकारण केलेले आहे. नातेपुते येथील सुप्रसिद्ध व जुन्या सक्षम संस्थेत नोकर भरतीच्या वेळी राजकीय हेतू ठेवून नोकरी दिली जात असत. नोकर भरतीच्या वेळी भ्रष्टाचार व इतर आर्थिक व्यवहारात घोटाळ्याच्या चौकशीसाठी लवकरच शिष्टमंडळ महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेणार आहेत त्यामुळे बडा राजकीय नेता चौकशीच्या भोवऱ्यात अडकून अटक होण्याची नातेपुते परिसरात कुजबुज सुरू आहे, अशी बातमी बारामती झटका वेब पोर्टल यांनी प्रसारित केल्यानंतर अनेक पीडितांनी संपर्क साधलेला आहे. बारामती झटका यांच्याकडे उपलब्ध झालेल्या कागदपत्रामध्ये पाहिल्यानंतर धक्कादायक प्रकार नातेपुते येथील शिक्षण संस्थेच्या नोकर भरतीत आईचा घो… झाल्याचा प्रकार शिक्षण आयुक्त यांना शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी दिलेल्या सुनावणीत पाहिल्यानंतर पुन्हा सुनावणी व इतिवृत्तांत उकरणे गरजेचे असल्याचे संबंधित नातेवाईक यांच्याकडून बोलले जात आहे.
पीडित शिक्षिका यांच्याकडून प्राप्त झालेली कागदपत्रे त्यामध्ये जाहिरात, नियुक्तीपत्र, शिक्षण सेवक प्रस्ताव, त्रुटी पत्र, रुजू अहवाल, सहशिक्षिका प्रस्ताव, मान्यतेस विलंब झाल्याने याचिका, उच्च न्यायालयाचा निकाल, उपसंचालक यांना विनंती अर्ज, शाळा चौकशी अहवाल जिल्हा परिषद सोलापूर, उपसंचालक यांचा निर्णय, सुधारित आदेश मिळणेबाबत पत्र, आयुक्तांना निवेदन असा 27 पानांचा पत्रव्यवहार झालेला आहे.
शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे यांचे कार्यालयात सुनावणी इतिवृत्तांत औदुंबर उकिरडे यांनी शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे सादर केलेल्यामध्ये
विषय – शाळेचे नाव त्यामधील तत्कालीन पीडित यांच्या स्वाक्षरीच्या बनावट आणि शिक्षण विभागात सोलापूर मध्ये नोंद नसलेल्या प्रशालेतील सर्व शिक्षक आणि तत्कालीन मुख्याध्यापक आणि संस्था जनरल सेक्रेटरी यांच्यावर शिक्षण विभागाची फसवणूक केली असल्याने त्यांच्यावर भारतीय दंड संहिता 67 ,68, 71, 406, 409 आणि 420 अन्वये फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करणे बाबत शिक्षणाधिकारी माध्यमिक सोलापूर यांना आदेश होणे बाबत या विषयावर सुनावणी झाली. त्यामध्ये शिक्षण उपसंचालक श्री. औदुंबर उकिरडे शिक्षण उपनिरीक्षक, श्री. धनाजी बुटे शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा सोलापूर यांचे कार्यालयातील कक्ष अधिकारी श्री. अजित देशमुख यांच्यासह शाळा व संस्था प्रतिनिधी यांचे सुप्रसिद्ध वकील, तत्कालीन संस्था सेक्रेटरी, माजी मुख्याध्यापक, सहशिक्षिका व सहशिक्षक सहा जण, पूर्णवेळ ग्रंथपाल अशा १५ लोकांच्या उपस्थितीत सुनावणी झालेली होती. सदरच्या सुनावणीचा अहवाल बारामती झटका यांना प्राप्त झालेला आहे.
सुनावणी इतिवृत्तांत निर्णय पाहिल्यानंतर दुबारा सुनावणी झाल्यास खऱ्या अर्थाने दूध का दूध, पाणी का पाणी होईल. नातेपुते येथील नोकर भरतीच्या आईचा घो… झाल्याचा प्रकार लवकरच समोर येईल यासाठी पिडीतांनी संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्याशी 98 50 10 49 14 या नंबरवर संपर्क साधावा, असे पीडित व त्यांच्या नातेवाईकांना आवाहन करण्यात येत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.