धक्कादायक प्रकार, तलाठ्याचा प्रताप नोंदीसाठी पैसे दिले नाहीत म्हणून एकाची जमीन केली दुसऱ्याच्या नावावर

माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील फडतरी येथील ग्राम महसूल अधिकारी चव्हाण यांनी शेतक-यांनी नोंदीसाठी पैसे दिले नसल्याचा राग मनात ठेवून खरेदीखताप्रमाणे व सूची क्र. 2 प्रमाणे जमीन खरेदीची नोंद न धरता चुकीच्या पद्धतीने नोंद धरल्याने शेतक-याला मानसिक त्रास दिला आहे. फडतरी येथील शेतकरी प्रवीण चंद्रकांत रूपनवर, कल्पना ज्ञानदेव रूपनवर व पृथ्वीराज भिमराव रूपनवर यांनी २५ फेबुवारी रोजी दुय्यम निबंधक माळशिरस येथे फडतरी येथील जमीन गट नं. 282 मधील नामदेव जगन्नाथ दोलताडे यांचेकडून खरेदीखताने 21.60 आर ही जमीन प्रवीण चंद्रकांत रूपनवर यांना 10.60 आर खरेदी घेतली व कल्पना ज्ञानदेव रूपनवर व पृथ्वीराज भिमराव रूपनवर यांना सामाईकात 11 आर याप्रमाणे संपूर्ण 21.60 आर आपल्या हिस्याची जमीन खरेदी दिली.
अशी नोंद सूची क्र. 2 ला व खरेदीदस्ताला आहे. मात्र असे असताना देखील दुय्यम निबंधक कार्यालयाकडून आलेल्या ऑनलाईन नोंदी प्रमाणे नोंद न धरता शेतक-यास कसा त्रास द्यायचा म्हणून मनमानीपणाने खरेदीदस्त व सूची क्र. 2 प्रमाणे नोंद न धरता सध्या सदर खरेदीदार यांचे सात बारा उता-यावरती फेर क्र. 2554 नुसार प्रवीण चंद्रकांत रूपनवर यांना 11 आर व कल्पना ज्ञानदेव रूपनवर आणि पृथ्वीराज भिमराव रूपनवर यांना सामाईकात 10.60 आर अशी चुकीच नोंद मंडळ अधिकारी यांचे संगनमताने प्रमाणितसुद्धा केली आहे. या केलेल्या प्रतापामुळे शेतक-याच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन व पैसे दिले नाहीत म्हणून त्रास देण्याच्या उद्देशाने जाणूनबुजून मानसिक त्रास दिला आहे.

सध्या माळशिरस तालुक्यात महसूल खात्यासह अनेक शासकीय कार्यालयात प्रचंड अंदाधुंद कारभार सुरु असून प्रशासनावरती कोणत्याही अधिकारी यांचा वचक राहिलेला दिसून येत नाही. जो तो अधिकारी, कमर्चारी कशा पद्धतीने माया गोळा करायची यांच्याच पाठीमागे लागलेला असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. तर तलाठी शेतकरी यांची अडचण बघून आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा उपयोग शेतक-याच्या अडचणी सोडविण्यासाठी न करता अडचणी कशा वाढतील व शेतक-याची जास्तीत जास्त आर्थिक पिळवणूक करून आपल्या दैनंदिन गरजा वरच्या पैशांनी कशा पूर्ण करता येतील यांच्याच पाठीमागे लागलेला आहे.
या आर्थिक पिळवणूकीमुळे शेतक-यावरती काय वेळ येईल, तो कोठून पैसे उपलब्ध करेल याचं काहीही देणं घेणं अधिकारी यांना पडलेलं नाही. उलट शेतक-यावरती उपकाराची भाषा करून शेतक-यांना व कोणी सांगण्यास गेले तर त्यांना सरळ वेड्यात काढून अपशब्द देखील बोलण्यास हे फडतरीचे तलाठी चव्हाण मागे पुढे पाहत नाहीत. हे जनतेचे सेवक न राहता एक प्रकारचे भक्षक झाले आहेत. प्रशासनात नोकरी लागली म्हणजे पैसे कमविण्याच्या धंद्याचे रितसर लायसन मिळाले सारखेच त्यांना वाटत आहे. पैसे मिळविण्यासाठी आपल्या ज्ञानाचे भांडवल करून समोरचा कसा अडचणीत सापडेल याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यासाठी धडपडत आहे आणि समोरचा अडचणीत सापडला तर त्याच्याकडून कशी वसुली करायची हे त्यांना आता पक्क ठावूक झालं आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.