धक्कादायक प्रकार – विजयसिंह मोहिते पाटील विकास सेवा संस्थेने सभासदाच्या नावे बनावट सह्या करून बोगस कर्जरोखा करून अपहार केला..

पीडित सभासद शेतकरी श्री. वसंत गणपत बागल यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अकलूज यांच्याकडे तक्रार करूनसुद्धा न्याय मिळाला नाही..
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील विजयसिंह मोहिते पाटील विकास सेवा सहकारी संस्था मर्यादित, तोंडले या संस्थेने बोगस कर्जरोखा करून पैशाचा अपहार केलेला आहे. माझे वर अन्याय केलेला आहे. तरी, सदरच्या सहकारी संस्थेवर कायदेशीर कार्यवाही करावी अशी लेखी तक्रार पीडित सभासद शेतकरी श्री. वसंत गणपत बागल, रा. तोंडले, ता. माळशिरस यांनी केलेली होती.
सदरच्या तक्रारी अर्जामध्ये विजयसिंह मोहिते पाटील विकास सेवा सहकारी संस्था मर्यादित तोंडले, ता. माळशिरस या संस्थेचे विद्यमान सचिव, माजी सचिव, चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळ सन 2021 या कालावधीतील नावे व पत्ते मिळावेत, असाही उल्लेख केलेला होता. सदरच्या तक्रारीच्या अनुषंगाने सहाय्यक निबंधक सहकारी संस्था श्री. एम. एल. शिंदे यांनी चेअरमन व सचिव विजयसिंह मोहिते पाटील विकास सेवा सहकारी संस्था मर्यादित तोंडले यांना दि. 27/06/2022 रोजी पत्र दि. 17/06/2022 च्या अर्जानुसार काढलेले होते. सदरच्या पत्रामध्ये श्री. वसंत गणपत बागल रा. तोंडले यांनी आपले संस्थेचा सभासद असल्याचे व त्यांची जमीनीवर पीक कर्ज काढून सेक्रेटरीवर चेअरमन यांनी डुप्लिकेट सह्या करून परस्पर रोखा तयार करून बँकेतून पैसे काढले आहेत. सदरची बाब नीलचा दाखला मागणी केल्यावर समजलेली आहे.
सदरचा अर्ज या कार्यालयास आलेला असल्याने सोबत ओरिजनल सही व डुप्लिकेट सहीची प्रत सादर केलेली आहे. सदरच्या अनुषंगाने पडताळणी कामे दि. 15/07/2022 रोजी दु. 3 वाजता या कार्यालयात सुनावणी आयोजित केले असून सदर सुनावणीस आपण कर्ज खतावणी व कर्जाचे अनुषंगाने संबंधित कागदपत्रासह उपस्थित रहावे असे पत्र देऊन सदरच्या पत्राची प्रत श्री. वसंत गणपत बागल यांना दिलेली होती. मात्र, पुढे काय झाले याचे गुलदस्त्यात असल्याचे सांगत पीडित शेतकरी यांनी घोर निराशा व्यक्त केली आहे.
कर्जरोखा बनावट सह्या करून खात्यावर जमा करून पिढीत शेतकरी यांच्या खात्यावर जमा झाल्यानंतर त्यांच्या पासबुक पुस्तकावर नोंद होणे गरजेचे होते. परंतु, बनावट सर्व असल्याने पीडित शेतकरी यांच्या पासबुकवर सुद्धा नोंद नाही. त्यांनी कर्ज रोख्यावर सह्या न करता त्यांच्या सातबारा उताऱ्यावर 1 लाख 60 हजार रुपयाचा बोजा चढलेला आहे. आर्थिक परिस्थिती गरिबीची आहे. दिवसेंदिवस जगणे मुश्किल होत चाललेले आहे. उताऱ्यावर बोजा असल्याने इतर बँकेचे लोन घेता येत नाही, अशी अडचण होऊन बसलेली आहे. पीडित शेतकऱ्याला जर आठ दिवसांमध्ये न्याय मिळाला नाही तर शेतकरी संघटना आक्रमक होऊन सहाय्यक निबंधक कार्यालय व संस्थेवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आक्रमक भूमिका घेणार आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.