धाकोरे येथे मायनिंग कंपनीकडून ड्रोन सर्व्हेला ग्रामस्थांचा कडाडून विरोध
वेळ पडल्यास संघर्ष करू पण, मागे हटणार नाही; ग्रामस्थांची भूमिका कायम…
तिरोडा (बारामती झटका)
आजगाव दशक्रोशीमध्ये येऊ घातलेल्या मायनिंग प्रकल्पाला जोरदार विरोध करत सोमवारी होणाऱ्या ड्रोन सर्व्हेला कडाडून विरोध ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांचा विरोध असतानाही जर सर्व्हे सुरू केला तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला शासन जबाबदार राहील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
आजगाव मराठी शाळेच्या प्रांगणात मायनिंग विरोधी सभेचे आयोजन रविवार दि. 07 जुलै 2024 रोजी करण्यात आले होते. या सभेला आजगाव धाकोरे मधील जवळपास 500 ग्रामस्थांची उपस्थिती होती. स्ट्रीगर जिओ सायन्स माध्यमातून ड्रोनसर्व्हे करणार असून त्याविरोधात ग्रामस्थ एकवटले होते. आजच्या सभेचे आयोजन हे आजगांव, धाकोरे, आजगांव-भोमवाडी ग्रामस्थांनी केले होते. आजगाव धाकोरे, आजगाव भोमवाडी, सागरतीर्थ, आरवली तळवणे, नाणोस, तिरोडा मळेवाड, गुळदुवे या गावचे सरपंच, उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते व मोठ्या संख्येने ग्रामस्थांची सभेला उपस्थिती होती.
यावेळी व्यासपीठावर सौ. यशश्री सौदागर मॅडम, ॲड. भरत प्रभू साहेब, श्री. हेमंत मराठे साहेब, आजगांव येथील पोलीस पाटील सौ. निकिता पोखरे मॅडम, श्री. रूपेश धर्णे साहेब, श्री. एकनाथ नारोजी साहेब, श्री. समीर कांबळी साहेब, श्री. रामचंद्र गवस साहेब, श्री. सुशील कामटेकर साहेब, अनुराधा वाडकर मॅडम, सौ. स्नेहा मुळीक मॅडम आदी उपस्थित होते.
शनिवार दि. 06 जुलै 2024 रोजी पोलीस अधीक्षकांनी वेंगुर्ला पोलीस स्टेशनला पत्र पाठवून आजगांव, आजगांव – भोमवाडी, धाकोरे, आरवली यांच्या सरपंचांना वेंगुर्ला पोलिस स्टेशनला बोलावण्यात आले. पोलिसांनी मायनिंग संबंधी प्रत्येकाचे मत विचारले. यावर सर्व सरपंचांनी गावचा विरोध असल्याचे ठाम सांगितले. या मायनिंग प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आजगाव मराठी शाळेच्या सभागृहात आयोजित केलेल्या बैठकीत खालील उपस्थित व्यक्तींनी मार्गदर्शन केले.
मळेवाड ग्रापंचायत येथील श्री. हेमंत मराठे साहेबांनी मत मांडले कि, मळेवाड ग्रामपंचायतला ड्रोन सर्व्हेचे पत्र दिले नाही. राजकीय पुढाऱ्याच्या हातात नेतृत्व देऊ नका. कळणे मायनिंगवेळी पत्रकार म्हणून प्रकार बघीतला आहे. दर्दी हवेत, गर्दी नको असे मत मराठे यांनी व्यक्त केले. जय राजकीय पक्ष आपणाला पाठिंबा देतील त्याचा पाठिंबा घेऊया. मात्र, आपल्या संघर्षाचा झेंडा राजकीय पुढाऱ्याच्या हातात द्यायचा नाही आणि आपल्यात फूट पाडव्या नको. फूट पडेल तीच मायनिंगची नांदी असेल. माझी या मातीशी नाळ कंपनीला मायनिंग सुरू करण्यासाठी 100 एकर जागा लागते, ती मिळाल्यास मायनिंग सुरू होईल, इतर गावांचा सहभाग घ्या, एकच धोरण, एकच तोरण- मायनिंग विरोध. यावेळी त्यांनी तिंबलो मायनिंगचं संकट मळेवाड गावावर घोंघावत असल्याची खंत बोलून दाखवली.
शिरोडा – वेळागर येथील ग्रामस्थ श्री. जयप्रकाश चमणकर यांनी ग्रामस्थांमार्फत मत व्यक्त केले कि, सर्व्हे 39 शिरोडा वेळागरतर्फे मत मांडण्यासाठी उभा आहे. पुढील सभेला वेळागरच्या 100 लोकांना घेऊन मायनिंग विरोधाला पाठींबा देतोय. जिल्हा आंबा बागायतदार संघटनेतर्फे लढ्याला पाठिंबा देतोय.
गुळदुवे सरपंच श्री.रूपेश धर्णे साहेब – मायनिंग नको, गुळदुवे ग्रामस्थांचा लढ्याला पूर्ण पाठिंबा.
वेळागर येथील श्री. ईर्शाद शेख यांनी मत मांडले कि, वेंगुर्ला – सावंतवाडी येथील गाव सिडकोला देण्यात आल्याचा GR 4/3/24 रोजी शासनाने काढला असून सरपंचांचे सर्व अधिकार काढून घेण्यात आले आहेत. यात मठ, वायंगणी तुळस, अणसूर, मोचेमाड, भोगावे, कोचरे, म्हपण, आजगांव, धाकोरे , कोंडुरे, सातार्डा इ. ही गावं सिडकोकडे देण्यासाठी आली आहेत. मात्र हे करत असताना येथील ग्रामस्थांचे मत विचारात घेतले का? शासनाने परस्पर निर्णय विचारण्याची गरज होती.
आजगांव येथील वकिल श्री. भरत प्रभू साहेब – संयमाने कृती करण्याची गरज. 50 वर्षांसाठी सरकारने सदर कंपन्यांना जमीन लीजवर दिली आहे. स्वामित्व रक्कम ठरवलेली आहे. परिस्थिती शेवटच्या स्टेजला आहे. मायनिंग सुरू करण्यासाठी उद्योग, उर्जा मंत्र्यांची सही आवश्यक. मायनिंग मान्यता रद्द करणं राज्याच्या उद्योगमंत्र्यांच्या हातात आहे. त्यांच्या सहीशिवाय मायनिंग लीज रद्द होत नाही. सुरू होण्यापूर्वी मायनिंग रद्द होणं शक्य आहे. जिल्ह्यातील आमदार, खासदार जनतेप्रती संवेदनशील नाही. आता लढ्याची पुढची दिशा म्हणून हरित लवादकडे दाद मागणे हाच उपाय, कोर्टाशिवाय आपण मायनिंग थांबवू शकत नाही. सिंधुदुर्गातील प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीने त्यांच्या सभेत मायनिंग विरोधी ठराव घेऊन आजगावातील मायनिंग विरोधी लढ्याला पाठिंबा असल्याचे कळवावे. लढ्यात जास्तीत जास्त लोकांना समर्थन मिळणं गरजेचं. विरोध कायदेशीर मार्गानेच हवा. विरोधाला न्यायिक लढ्याची गरज. समिती नेमून नोंदणी प्रक्रिया करू, आर्थिक फंड जमा करणे, हरित लवादाकडे केस दाखल करणे.
आरवलीचे सरपंच श्री. समीर कांबळी साहेब – शुक्रवारी वेंगुर्ला पोलिस स्टेशनमधून फोन आला. शनिवारी 10 वाजता हजर रहा. मायनिंग विषयक तुमचे म्हणणे मांडा. राजकिय लोकांची मदत घ्या, मात्र त्यांना लढ्यात सहभागी करून घेऊ नका.
आजगांवचे सरपंच सौ. यशश्री सौदागर मॅडम – लढ्याची पुढची पायरी म्हणजे हरित लवादकडे प्रकरण पाठवणं. संघर्ष समिती तयार करण्यात आली. शिष्टमंडळ तयार करून मुख्यमंत्र्यांची भेट घेणं. जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्र देणार असून NOC दिली नसताना ड्रीम सर्व्हे करण्यासाठी कशी परवानगी दिली याबाबत सरपंचासह ग्रामस्थ भेटणार.
आजगाव – धाकोरे यामध्ये मायनिंग कंपनीकडून सोमवार दि. 08 जुलै 2024 रोजी होणाऱ्या ड्रोन सर्व्हेला ग्रामस्थांचा कडाडून विरोध, वेळ पडल्यास संघर्ष करू पण, मागे हटणार नाही, अशी ग्रामस्थांची भूमिका होती.
श्री. दिनेश शांताराम मयेकर.
सामाजिक कार्यकर्ते व समाजसेवक तिरोडा (सावंतवाडी, सिंधुदुर्ग)
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
child porn