ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

धनगर जागर यात्रेनिमित्त आ. गोपीचंद पडळकर यांच्या माळशिरस तालुक्यातील विझोरी येथे जाहीर सभेचे आयोजन…

श्रीराम शिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांचे हेलिकॉप्टर उतरणार आहे..

माळशिरस (बारामती झटका)

विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा लढा आरक्षणाचा, लढा हक्काचा यासाठी महाराष्ट्रात धनगर जागर यात्रेनिमित्त जाहीर सभांचे आयोजन सुरू आहे. माळशिरस तालुक्यातील सकल धनगर समाजबांधव यांच्यावतीने अकलूज-विजयवाडी रोड, गोसावी बुवा मंदिरा शेजारी, विझोरी, ता. माळशिरस, येथे सोमवार दि. 16/10/2023 रोजी सकाळी नऊ वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

धनगर समाज बांधवांचा अनुसूचित जाती जमातीमधील समावेशाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी धनगर समाजाच्या आरक्षणाचे घोंगडे राज्य व केंद्र सरकारने भिजत ठेवलेले आहे. अनेकवेळा धनगर समाज बांधवांकडून मेळावे, मोर्चे, आंदोलने, उपोषणे झालेली आहेत. कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी आरक्षणाचा प्रश्न निकालात निघालेला नाही.

सध्या केंद्रात व राज्यात भाजपच्या विचाराचे सरकार आहे. भाजपमध्ये गोपीचंद पडळकर आहेत. त्यामुळे धनगर जागर यात्रा जाहीर सभांना विशेष महत्त्व असून धनगर समाज बांधवांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे.

माळशिरस तालुक्यातील सकल धनगर समाज बांधव यांच्याकडून जोरदार जाहीर सभेची तयारी सुरू आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांचे हेलिकॉप्टरने आगमन होणार आहे. श्रीराम शिक्षण संस्थेच्या भव्य पटांगणामध्ये हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी हेलिपॅड तयार करण्यात आलेले आहे. माळशिरस विधानसभेचे धाडसी आमदार स्वर्गीय शामरावभाऊ पाटील आणि धनगर समाज बांधव यांचे अतूट नाते आहे. सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रकाशबापू पाटील व पंचायत समितीच्या कर्तव्यदक्ष माजी सदस्या श्रीलेखाताई पाटील यांनी भाऊंचा वारसा जपलेला आहे. तिसऱ्या पिढीतील श्रीराम शिक्षण संस्थेचे सचिव अभिषेकभैया पाटील व करणभैय्या पाटील हेही हा वारसा जपत आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button