ताज्या बातम्याराजकारण

“धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय”, अशी अवस्था मोहिते पाटील यांची झाली आहे..

माळशिरस (बारामती झटका)

माढा लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक असलेले धैर्यशील मोहिते पाटील उमेदवारी मिळावी, अशी मनामध्ये अपेक्षा बाळगून होते. माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना पुनश्च माढा लोकसभेची भाजप व महायुतीची उमेदवारी जाहीर झालेली असल्याने “धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय”, अशी अवस्था मोहिते पाटील परिवार यांची झालेली आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा, कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सहकार्याने व मदतीने माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघात अनेक प्रलंबित सिंचन, रेल्वे, रस्ते व अनेक कामांचा पाठपुरावा करून अनेक कागदावरील योजना मार्गी लावलेल्या आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघात भाजप व इतर पक्षातील आमदारांना हेवा वाटावा असे कार्य माढा लोकसभेचे कार्यतत्पर खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेले आहे. हे मतदारसंघात मोहिते पाटील व मोहिते पाटील समर्थक यांना खूपत होते. त्यामुळे रणजीतसिंह नाईक निंबाळकर व भारतीय जनता पक्षाची प्रतिमा मलीन करण्याचे काम सुरू होते. लोकसभेसाठी इच्छुक असणे साहजिक आहे मात्र, लोकप्रतिनिधी व पक्षाला बदनाम करून इच्छुक असणे भारतीय जनता पक्षाच्या ध्येयधोरणाच्या विरोधात आहे. माढा लोकसभेसाठी इच्छुक असलेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी पोस्टरबाजी करून खासदारच असे मतदारसंघात फिरत होते. याचीही दखल भारतीय जनता पक्षाने घेतलेली असावी. भारतीय जनता पक्षाने उमेदवारी जाहीर करून सुद्धा मोहिते पाटील परिवार यांनी मतदार संघात भेटीगाठी दौरा सुरू केलेला आहे. महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवण्याची धडपड सुरू आहे. उमेदवारी मिळेल, का नाही, याची खात्री नाही. त्यामुळे भाजपचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात दंड थोपटलेले मोहिते पाटील यांची अवस्था “धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय”, अशी होऊन बसली असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button