धर्म, संघटन आणि संस्कृतीचा विजयोत्सव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

वडूज (बारामती झटका)
वडूज, ता. खटाव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक शताब्दी वर्षानिमित्त आज रविवारी वडूज शहरातून स्वयंसेवकांचे शिस्तबद्ध पथ संचलन पार पडले. या संचालनाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघशक्तीचे विराट दर्शन झाले.
संघदृष्ट्या वडूज शहरातील हुतात्मा हायस्कूल छत्रपती शिवाजी महाराज चौक मुख्य रस्त्यावर स्वयंसेवकांनी घोषाच्या तालावर शिस्तबद्ध पद्धतीने विविध मार्गावरून पथसंचलनाद्वारे देशभक्तीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला.

शहरातील विविध मार्गावरून रा. स्व. संघाची शिस्त, एकजूट, राष्ट्रनिष्ठा याचे विराट दर्शन या संचलनाच्या माध्यमातून नागरिकांना घडले. संघ स्थापनेच्या शताब्दी वर्षाच्या पंचसूत्री कार्यक्रमांची सुरुवात हुतात्मा हायस्कूल येथून या संचलनापासून झाली. शेकडो स्वयंसेवकांनी संचलनात सहभाग घेतला.
संचलन मार्गावर ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार मा. श्री. जयकुमार गोरे यांनी स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे जोरदार स्वागत केले. अनेक ठिकाणी महिलांनी औक्षण करून या संचलनाला आपला पाठिंबा दर्शवला. देशभक्तिमय वातावरणात पथसंचलन व उत्सव दोन्ही पार पडले.
शताब्दी वर्षानिमित्त संचलनाद्वारे सामाजिक बांधिलकी व मूल्यांचा प्रसार देशातील शेवटच्या घटकांपर्यंत करण्यास सुरुवात झाली आहे. यातून सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, स्वबोध आणि नागरी शिष्टाचार या पंचसूत्रीबाबत आगामी काळात कर्तव्य करण्याचा संदेश देण्यात आला. “प्रत्येक स्वयंसेवकाने आपापल्या क्षेत्रात सक्रिय राहून समाज परिवर्तनाचे काम करावे,” हा या संचलनाचा मुख्य संदेश विविध वक्त्यांनी उत्सवात मांडला.

संचलनांतर उत्सव व शस्त्रपूजन
शिस्तबद्ध संचालन पार पडल्यानंतर संघ शताब्दी उत्सव साजरा झाला. समाजातील प्रभावी व्यक्तींना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. आगामी काळात गृहसंपर्क हिंदू संमेलन व पंचसूत्री यावर प्रत्येक घटकाला आपलेसे करण्याचा कानमंत्र यावेळी देण्यात आला.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



