कृषिवार्ताताज्या बातम्या

विठ्ठल कॉर्पोरेशन लि. म्हैसगांव कारखान्याचा ऊस दर प्रती मे.टन २७००/- रुपये जाहीर – आमदार संजयमामा शिंदे

कन्हेरगांव (बारामती झटका) धनंजय मोरे यांजकडून

विठ्ठल कॉर्पोरेशन लि. म्हैसगांव ता. माढा, या साखर कारखान्याचे विस्तारीकरण अल्पावधी कालावधीमध्ये करुन कारखान्याचा १६ वा गाळप हंगाम सन २०२३-२४ सुरळीतपणे सुरु झालेला आहे. तसेच ऊस तोडणी वाहतुक यंत्रणाही कारखान्याकडे पुरेश्या प्रमाणामध्ये उपलब्ध झालेली आहे.

या चालू गाळप हंगाम सन २०२३-२४ करीता गाळपास येणा-या ऊसासाठी पहिला अॅडव्हान्स हप्ता विठ्ठलराव शिंदे सह. सा. का. लि. पिंपळनेर या कारखान्याप्रमाणेच प्रती मे. टन २७०० रुपये प्रमाणे सभासद व बिगर सभासद ऊस पुरवठादार शेतक-यांना अदा करणार असल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ. संजयमामा शिंदे यांनी दिली.

या प्रसंगी विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक यशवंत शिंदे, मुख्य कार्यकारी आर. एस. रणवरे, कार्यकारी सल्लागार विजयकुमार गिलडा, असि. जनरल मॅनेजर वैभव काशिद, चिफ इंजिनिअर मोहन पाटील, चिफ केमिस्ट प्रदीप केदार, डिस्टीलरी मॅनेजर अनिल शेळके, मुख्य वित्तीय अधिकारी भास्कर गव्हाणे, मुख्य शेती अधिकारी महेश चंदनकर, परचेस अधिकारी कल्याण पाटील, प्रशासकीय अधिकारी प्रदीपकुमार पाटील, एच. आर. मॅनेजर परमेश्वर माळी, सुरक्षा अधिकारी सचिन शिंदे यांच्यासह विठ्ठल कॉर्पोरेशन मधील विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button