धर्मपुरी येथे नोंदणीकृत इमारत व बांधकाम कामगार लाभार्थ्यांना भांडी संच वाटप

मा. खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून नोंदणीकृत इमारत व बांधकाम कामगार लाभार्थ्यांना भांडी संच वाटप
धर्मपुरी (बारामती झटका)
माढा लोकसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून नोंदणीकृत इमारत व बांधकाम कामगार लाभार्थ्यांना भांडी संच वाटप शुक्रवार दि. ७/११/२०२५ रोजी दुपारी २ वा. ३० मि. शुभारंभ लॉन्स धर्मपुरी बंगला, ता. माळशिरस येथे करण्यात येणार आहे.

यावेळी प्रमुख उपस्थितीत ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे, माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राम सातपुते, भाजपचे सोलापूर पश्चिम ग्रामीण जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख आदी मान्यवरांसह सर्व कार्यकर्ते व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
तरी सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपचे सोलापूर पश्चिम ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष बाजीराव काटकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



