कृषिवार्ताताज्या बातम्याशैक्षणिक

धर्मपुरी येथे कृषीदुताने दाखवले गांडूळ खत निर्मितीचे प्रात्यक्षिक

धर्मपुरी (बारामती झटक)

शेती व्यवसायात रासायनिक खतांचा वापर कमी करून शेतकऱ्यांनी गांडूळ खत निर्मितीची नामी युक्ती साधावी. विषमुक्त शेती केल्यास गांडूळ खतांमुळे भरघोस उत्पन्नाची हमी देता येते, असे प्रतिपादन रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूजच्या कृषीदुतांनी धर्मपुरी येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना केले.

रत्नाई कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम प्राचार्य अर्ज नलावडे समन्वयक एस. एम. एकतपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मपुरी येथे आयोजित केला आहे. यामध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रशिक्षण व कृषी मार्गदर्शन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून गांडूळ खत निर्मिती, प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात आले. याचे प्रात्यक्षिक दाखवून खताचे महत्त्व सांगण्यात आले.

यावेळी कृषिदूत सुदर्शन सांगळे व सार्थक गवळी यांनी हे प्रात्यक्षिक करून दाखवले. प्रात्यक्षिकाची माहिती घेताना श्री. कुंदन गुज्जर व त्यांचे परिवार सहभागी होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button