धावत्या बाईकवर जोडप्याचा रोमान्स, अश्लील चाळे, लाज न लज्जा

पुणे (बारामती झटका)
पुणे परिसरात रस्त्यावरून जात असलेल्या एका जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. दुचाकीवरून प्रवास करत असताना या जोडप्याने रोमान्सच्या नावाखाली जीव धोक्यात घालून अश्लील चाळेच सुरू केले.
एक तरुणी दुचाकीच्या टाकीवर बसलेली आहे आणि पुरूष दुचाकी चालवतोय. भरधाव दुचाकीवरच महिलेचा थिल्लरपणा सुरू होतो. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील प्रकार पुण्यातील शिंदेवाडी भागात घडला आहे.

खेड-शिवापूर परिसरातील भररस्त्यावर जोडप्याचे हे चाळे सुरू होते. पाठीमागून येत असलेल्या एका दुचाकीस्वाराचे या जोडप्याकडे लक्ष गेले. त्याने त्यांचा व्हिडीओ शूट केला. बरेच अंतर पुढे जाईपर्यंत या जोडप्याचे दुचाकीवर अश्लील चाळे सुरूच होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



