Uncategorized

धोंडी आबाजी पाटील यांचे महालक्ष्मी मंदिर परिसर सुशोभीकरणाचे स्वप्न सत्यात उतरले….

माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्याकडुन पिलीव परीसरातील विकासकामांची पाहणी व उदघाटन…

पिलीव (बारामती झटका)

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व
माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी पिलीव परीसरात आपल्या तत्कालीन आमदार फंडातुन मंजूर केलेली विकासकामे यामध्ये सुरू असणाऱ्या कामाची पाहणी केली. पिलीव गावचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिर परिसर सुशोभीकरण व मंदिर परिसर विकास होत असल्याने पिलीव गावचे थोर सुपुत्र व महालक्ष्मीचे निस्सीम भक्त धोंडी आबाजी पाटील यांचे स्वप्न सत्यात उतरत असल्याने पिलीव पंचक्रोशीसह महालक्ष्मी भाविकभक्तांमध्ये आनंदाचे व भक्तिमय वातावरण निर्माण झालेले आहे.

माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार तत्कालीन आमदार राम सातपुते यांनी पिलीवचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिर परिसर व पिलीव पंचक्रोशीतील विकासकामांसाठी भरीव निधीची तरतूद केलेली होती. भाविकभक्त व कार्यकर्त्यांचा आग्रह, विकासनिधी आपण आणलेला आहे‌ त्यामुळे आपल्याच शुभहस्ते विकास कामांचा शुभारंभ व विकास कामांची पाहणी होणे गरजेचे असल्याने कार्यकर्त्यांच्या आग्रहास्त लोकप्रिय दमदार राम सातपुते यांनी काळामळा येथील डांबरीकरण केलेला रस्ता, महालक्ष्मी देवीकडे जाणाऱ्या ओढयावरील पुलाची पाहणी, तर महालक्ष्मी मंदिर परीसरात मंजूर केलेल्या भक्त निवास व पेव्हर ब्लॉक याचे भुमीपुजन, पिलीव येथील नवीन शासकीय विश्रामगृहाचे भुमीपुजन तसेच भैस-सुळे-भिसन वस्ती ओढयावरील पुलाचे उदघाटन लोकप्रिय दमदार रामभाऊ सातपुते यांच्या शुभहस्ते व भाजपचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सोपान नारनवर, भाजपा सोलापूर जिल्हा किसान मोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब सरगर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब वावरे, भाजपचे संघटन सरचिटणीस संजय देशमुख, निमगाव ग्रामपंचायतीचे सदस्य किरण पाटील, माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील भाजपचे युवानेते धर्मराज माने, माळशिरस नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवक आकाश सावंत, पिलीव गावचे भाजपचे कट्टर समर्थक युवा नेते राहुल मदने, भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष शिवराज पुकळे, कुसमोडचे सरपंच तुषार लवटे, प्रमोद भैस, संतोष शेंडगे, मेजर गलांडे, मयुर भैस, अंकुश भैस, गणेश पाटील, रामभाऊ गोरड, संजय पाटील, पुनम भैस, अर्जुन सुळे, राहुल भैस तसेच राजेंद्र मोहीते, यांच्यासह पिलीवचे ग्रामस्थ व महालक्ष्मी देवीचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार रामभाऊ सातपुते यांनी महालक्ष्मी देवीचे मनोभावे दर्शन घेतले. भाविकभक्तांना सर्व सोयी सुविधा पुरविण्यासाठी कटीबद्ध असुन निधी कमी पडु देणार नसल्याचे सांगीतले. यावेळी पत्रकार दिनानिमित्त पिलीव येथील सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी पिलीव गावाला आमदार असताना प्रचंड निधी मंजुर केला असल्याचे सांगितले. तर त्यांनी यावेळी आगामी ग्रामपंचायत निवडणुक पुर्ण ताकदीने लढा व भारतीय जनता पार्टीची सत्ता आणा पिलीवचा प्रचंड विकास करतो. गावच दत्तक घेतो, असे जाहीरपणे सांगीतले.

यावेळी पिलीव, झिंजेवस्ती, कुसमोड, बचेरी, शिंगोर्णी, सुळेवाडी, काळमवाडी भागातील अनेक मान्यवर, पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी अनेक समस्यांचा पाढा वाचला. त्यातील अनेक तक्रारी नागरिकांसमक्ष अधिकाऱ्यांना फोन लावत मार्गी लावल्या. यावेळी प्रमोद भैस यांनी आभार मानले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button