ताज्या बातम्याराजकारण

“धूमधडाका” लोकप्रिय दमदार राम सातपुते यांच्या शुभहस्ते अकलूजमध्ये भाजपच्या दहा शाखांचे धूमधडाक्यात उद्घाटन

अकलूज राजकीय राजधानीत भारतीय जनता पक्षाच्या एकाच वेळी दहा शाखांचे धुमधडाक्यात व दिमाखात उद्घाटन होणार…

अकलूज (बारामती झटका)

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या शुभहस्ते राजकीय राजधानी असणाऱ्या
अकलूज नगरपरिषद हद्दीत भारतीय जनता पार्टीच्या १० शाखाचे उदघाटन शुक्रवार दि. १०/०१/२०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजता धुमधडाक्यात व उत्साही वातावरणात उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे.

त्यामध्ये
1) अशोक चौक
2) आनंदनगर बायपास चौक
3) महाराणा प्रताप चौक
4) नवीन बाजार तळ २
5) गांधी चौक
6) राऊत नगर
7) जुना बाजर तळ
8) नागोबा कट्टा
9) संजयनगर
10) माळेवाडी

अशा प्रकारे १० शाखाचे उदघाटन लोकप्रिय दमदार श्री. रामभाऊ सातपुते यांच्या शुभहस्ते व राज्य, जिल्हा, तालुका पदाधिकारी, विविध मान्यवर यांच्या उपस्थितीत शाखांचे दिमाखात उद्घाटन होणार आहे.

या शाखाचे सर्व नियोजन अकलूज शहर अध्यक्ष श्री. महादेव कावळे व तालुका प्रभारी श्री. डॉ. निलेश ननवरे अकलूज व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते करत आहेत. अकलूजमध्ये पहिल्या पाच शाखांचे उद्घाटन झालेले आहे. उद्या दहा शाखांचे उद्घाटन होत असल्याने माळशिरस व सोलापूर जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्राचे लक्ष अकलूजकडे लागून राहिलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button