नूतन अधिकाऱ्यांनी ग्रामीण विकासासाठी प्राधान्य द्यावे – गोविंद कर्णवर पाटील

तरंगफळ येथे दिव्यांग दिन साजरा, दिव्यांग निधीचे वाटप
माळशिरस (बारामती झटका)
आपल्या परिसरातून अनेक अधिकारी उच्च पदावर जात आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात ग्रामीण भागातील विकासासाठी प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूजचे उपअभियंता श्री. गोविंद कर्णवर पाटील यांनी केले. ते तरंगफळ येथे ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त स्वर्गीय रत्नप्रभादेवी मोहिते पाटील दिव्यांग बहुउद्देशीय संस्था व ग्रामपंचायत तरंगफळ यांनी आयोजित केलेल्या नूतन अधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा व स्नेह मेळावा प्रसंगी बोलत होते. यावेळी डीवायएसपी प्रदीप गोरड म्हणाले, तरूण पिढीही सोशल मिडियावर बरबडले आहे हे भविष्यासाठी घातक आहे. त्यामुळे मोबाईलचा वापर महत्वाच्या वेळी करावा. असे सांगून शिक्षण हाच विकासाचा पाया आहे. त्याचबरोबर ध्येय, मेहनत, जिद्द याची सांगड घालावी तरच यश मिळेल असे प्रतिपादन नूतन डिवायएसपी प्रदीप गोरड यांनी केले.
तरंगफळ, ता. माळशिरस येथे राजमाता रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बहुउद्देशिय अपंग विकास संस्थेच्या वतीने दिव्यांग दिन व माळशिरस तालुक्यातील क्लास वन अधिकाऱ्यांचा सन्मान सोहळ्याप्रसंगी गोरड बोलत होते.
यावेळी पायलट कल्याणी शिंदे, सागर रणनवरे, दिपाली खरात, सायली पराडे, काजल भोसले, ज्ञानेश्वरी पवार, पै. दत्ता मगर, मच्छिंद्र गोरड, अजय तरंगे, ग्रामपंचायतीच्या सरपंच पद्मिनी तरंगे, संस्थेचे अध्यक्ष गोरख जानकर, ग्रामपंचायत सदस्या जगुबाई जानकर, गोविंद कर्णवर पाटील, ॲड. शांतीलाल तरंगे, महेश पिंगळे, शशीकांत साळवे, सतीश कांबळे, संजय वाघमोडे, भागवत तरंगे, प्रा. सुहास तरंगे, सर्जेराव तरंगे, कुलदीप जानकर, संपत साळवे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पायलट कल्याणी शिंदे म्हणाल्या की, मी ग्रामीण भागातील आहे. तिथे त्यावेळी सुविधा नव्हत्या पण, वडिलांचे स्वप्न होतं मी पायलट व्हावं हि इच्छा पूर्ण केली मुलगी आहे. म्हणून रोखू शकणार नाही. आपलं ध्येय फक्त समाजाला सांगत बसू नका ते पाठीमागे ओढतात. आई वडिल पाठीशी उभे राहतात. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करत असल्याचे सांगितले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष गोरख जानकर म्हणाले कि, १९९९ पासून संस्थेच्या माध्यमातून गेली २४ वर्ष वंचित शोषित घटकांबरोबर दिव्यांग बांधवांसाठी अविरतपणे काम सुरू आहे. हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश या अधिकाऱ्यांचा संघर्ष, जिद्द, चिकाटी बालमनावर रूजावी हा आहे.
माजी मंत्री बच्चू कडू यांनी दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापनी केली. यांच्या मार्गदर्शनाखाली कामे सुरु आहेत. माळशिरस तालुक्यात दिव्यांगभवन होणे गरजेचे आहे, असे सांगितले .
प्रारंभी ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांगांसाठी पाच टक्के निधीचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष साठे यांनी केले तर आभार सूजित तरंगे यांनी मानले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



