ताज्या बातम्या

डॉ. कल्याण हुलगे यांनी माळशिरस नगरपंचायतीचा मुख्यकार्यकारी अधिकारी पदाचा पदभार घेतला.

माळशिरस नगरपंचायतीचे पदाधिकारी यांनी नवनियुक्त मुख्याधिकारी डॉ. कल्याण हुलगे यांचा सन्मान केला.

माळशिरस (बारामती झटका)

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पदी डॉक्टर कल्याण हुलगे यांची नव्याने नियुक्ती करण्यात आलेली आहे. डॉक्टर कल्याण हुलगे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर माळशिरस नगरपंचायतीचे मार्गदर्शक व माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक डॉक्टर आप्पासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. ताई सचिन वावरे व नगरसेवक यांनी डॉ. कल्याण हुलगे यांचा सन्मान केला.

डॉ. कल्याण हुलगे यांनी राज्यसेवा परीक्षा 2020 उत्तीर्ण होऊन संपूर्ण महाराष्ट्रात 21 वा क्रमांक मिळविला होता. ते मूळचे बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्यातील आहेत. त्यांचे शिक्षण दहावी 2008 जयप्रभा सेकंडरी स्कूल येथे पूर्ण झालेले होते. 2010 साली संगमेश्वर कॉलेज सोलापूर येथे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून 2015 साली के‌. बी. एच. डेंटल कॉलेज नाशिक येथून दंत वैद्यकीय पदवी घेतलेली आहे. त्यांचे वडील श्री. पंढरी हुलगे शासकीय सेवेत आहेत तर त्यांची आई सौ. चंद्रकला हुलगे उत्कृष्ट गृहिणी आहेत. डॉ. कल्याणराव हुलगे मंत्रालय मुंबई येथे कक्ष अधिकारी या पदावर कार्यरत होते. त्यांना माळशिरस नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे.

प्रशासनाचा दांडगा अनुभव असलेले डॉ. कल्याण हुलगे यांनी सत्कार झाल्यावर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सर्व सदस्यांबरोबर बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये नूतन मुख्याधिकारी यांच्या समवेत पदाधिकारी यांच्या बैठकीत प्रकर्षाने काही मुद्द्यांवर विशेष चर्चा झाली. काही विषयांवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या. माळशिरस नगरपंचायतीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, पाणीपुरवठा सुरळीत करणे, आरोग्य विभागाकडून शहर स्वच्छ करणे तसेच माळशिरस नगरपंचायत हद्दीमधील विनापरवाना वृक्षतोड होत आहे, त्या संबंधितांवरती कडक कारवाई करणे, सध्या डेंगूची साथ चालू आहे त्यामुळे नागरी वस्त्यांमध्ये योग्य ती औषध फवारणी करून घेणे, शहरामध्ये चौकाचौकांमध्ये विनापरवाना फ्लेक्स लावले जातात त्यांच्या वरतीही योग्य ती दंडात्मक कारवाई करणे अशा अनेक विषयांवरती चर्चा करण्यात आली.

यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख, विद्यमान नगराध्यक्षा सौ. ताई वावरे, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक शिवाजीराव देशमुख, नगरसेवक आबासाहेब धाईंजे, महादेव कोळेकर, कैलास वामन, रणजीत ओहोळ, अजिनाथ वळकुंदे, सचिन वावरे, संतोष वाघमोडे, जगन्नाथ गेजगे आदी मान्यवर उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

5 Comments

  1. BaddieHub I’m often to blogging and i really appreciate your content. The article has actually peaks my interest. I’m going to bookmark your web site and maintain checking for brand spanking new information.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button