डॉ. सुधाकर न्हाळदे यांचे कर्तृत्व व व्यक्तित्व सर्वस्पर्शी- डॉक्टर श्रीपाल सबनीस
पुणे (बारामती झटका)
डॉ. सुधाकर न्हाळदे सर्वांचे लाडके व समाजाभिमुख असणारे थोर कार्यकर्ते, यांच्या अमृत महोत्सवानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला. त्यावेळेस डॉ. श्रीपाल सबनीस यांनी त्यांना पगडी घालून सन्मान केला. त्यावेळेस त्यांच्याविषयी बोलताना म्हणाले की, सोज्वळ व सांस्कृतिक नागरिक हा समाज आणि संस्कृतीचे वैभव असतो. सेक्युलर व समृद्ध जाणीवेच्या माणसांचा समाज, राष्ट्राला उन्नत करत असतो. डॉ. सुधाकर न्हाळदे यांचे व्यक्तित्व व कर्तृत्व सर्वस्पर्शी आहे. अशा कार्यकर्त्यांमुळेच संस्कृतीची उंची वाढते. संवेदनशील व सत्यनिष्ठ माणसे हीच राष्ट्राची खरी संपत्ती असते. यावेळेस डॉ. अ. ल., देशमुख, डॉक्टर के. पी. व्ही. राव, प्राध्यापक अरुण रजाळे यांनी डॉ. न्हाळदे यांच्या सामाजिक, शैक्षणिक व प्रशासकीय कार्याचे कौतुक करून त्यांचे अभिष्टचिंतन केले.
सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीस मनोरंजनात्मक सुमधुर हिंदी, मराठी गीतांचा गीत सुधा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर अकरा महिलांनी ७५ दिव्यांनी त्यांना औक्षण केले. मुंबई, धुळे, जळगाव, सांगली, पुणे, अकोला, इंदोर येथून आलेल्या आप्तेष्टांनी, मित्रांनी त्यांना भावी काळासाठी, दीर्घायु निरोगी, आरोग्य लाभो, अशा सदिच्छा दिल्या.
डॉक्टर विनोद शहा, डॉक्टर जयंत शहा, डॉक्टर मुकुंद तापकीर, प्रल्हाद कोकरे, शशिकांत बुगदे, राम मांडुरके, डॉक्टर अरुण बुरांडे, नजीर तांबोळी, डॉक्टर सुरेश वाघमारे, डॉक्टर नरेश वाघमारे, ॲड. चारुशीला राठोड, डॉक्टर संयोगिता नाईक, सौ. ललिता सबनीस, सौ. संगीता न्हाळदे, विजयकुमार ठुबे, सतीश खाडे, प्रमोद जेजुरीकर, किरण ढमाले, सुहास पटवर्धन, श्रीरंग पटवर्धन, हेमचंद्र दाते, जयंती जोगळेकर, प्रकाश शेटकर, दिपाली देशमुख, डॉक्टर चंद्रकांत कुंजीर, नारायण ढेबे, प्राध्यापक रूपाली अवचरे, ॲड. वैशाली करे, डॉक्टर एस. एन. भावसार, भागवत सोनवणे, गोविंद दिघे, सोपान वेळे, वसंतराव माने, प्रभाकर न्हाळदे, शामराव हिवराळे, राकेश भावे, मोहित गावडे, डॉक्टर विशाल सरदेशपांडे आदी मान्यवर निवारा येथील सभागृहात कार्यक्रमास उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर न्हाळदे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे ऋणनिर्देश व्यक्त केले व कृतज्ञतेची भावना दर्शवली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माणिक सोनवलकर यांनी केले. त्यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
DMCA yasal süreç Google SEO, dijital pazarlama stratejimizin temel taşı oldu. https://www.royalelektrik.com/besiktas-kurucesme-elektrikci/
I do agree with all the ideas you have introduced on your post They are very convincing and will definitely work Still the posts are very short for newbies May just you please prolong them a little from subsequent time Thank you for the post
Your blog is a beacon of light in the often murky waters of online content. Your thoughtful analysis and insightful commentary never fail to leave a lasting impression. Keep up the amazing work!