डॉ. यशवंतराव कुलकर्णी यांना भारतीय शुगरचा बेस्ट एमडी पुरस्कार जाहीर
श्रीपूर (बारामती झटका)
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कर्तव्यदक्ष कार्यकारी संचालक डॉ. यशवंतराव कुलकर्णी यांना राष्ट्रीय पातळीवरील भारतीय शुगरचा बेस्ट एमडी पुरस्कार जाहीर झाला आहे. सदर संस्था राष्ट्रीय पातळीवरील नामांकित असून डॉ. यशवंतराव कुलकर्णी यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. सदर पुरस्कार १० फेब्रुवारी २०२४ रोजी कोल्हापूर येथे उच्च पदस्थ अधिकारी व सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ, राजकीय नेते यांच्या उपस्थितीत डॉ. कुलकर्णी यांना प्रदान करण्यात येणार आहे.
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याला आतापर्यंत देशपातळीवरील पन्नासहुन अधिक आदर्श व उत्तम कार्यप्रणालीबद्दल पुरस्कार मिळाले आहेत. योग्य नियोजन, शिस्तबद्ध पद्धतीने कामकाज, तांत्रिक सक्षमता, सुयोग्य आर्थिक स्थिती यामुळे कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना देशपातळीवर अग्रगण्य म्हणून लौकिकार्थाने आदर्श ठरला आहे.
डॉ. कुलकर्णी यांना आज जाहीर झालेल्या पुरस्काराची दखल कारखाना संचालक मंडळ, चेअरमन, व्हा. चेअरमन, अधिकारी वर्ग, कामगार, शेतकरी, सभासद यांनी घेऊन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. स्थानिक पातळीवर सामाजिक संघटना नेते, कार्यकर्ते यांनी समक्ष भेटून, फोनवर त्यांचे अभिनंदन केले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Insightful read! I found your perspective very engaging. For more information, visit: READ MORE. Eager to see what others have to say!