डोंबिवली येथे एकपात्री अभिनय स्पर्धा संपन्न.

डोंबिवली (बारामती झटका)
डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट प्रोडक्शन हाऊस आयोजित एकपात्री अभिनय स्पर्धा वर्ष ८ वे दि. ७ डिसेंबर २०२५ रोजी, डोंबिवली पश्चिम रेतीभवन बिल्डिंग, २रा मजला येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेचे परिक्षण अशोक हंडोरे सर यांनी केले.
सदर स्पर्धेमध्ये अनेक कलाकारांनी सहभाग घेतला व आपली कला सादर केली. डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग व दुर्वा एडुटेंमेंट प्रोडक्शन हाऊस यांच्याकडून विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व प्रमाणपत्र परिक्षकांच्या हस्ते बक्षीस स्वरुपात देण्यात आले. तसेच काही कलाकारांना उत्तेजनार्थ प्रमाणपत्र देण्यात आले.
सहभागी सर्व कलाकारांना परिक्षक अशोक हंडोरे सरांनी अभिनय व त्याचे विविध अंग याविषयी थोडक्यात पण महत्वपुर्ण मार्गदर्शन केले, त्यामुळे सर्व कलाकार खुश झाले. संस्थेचे संस्थापक व स्पर्धा आयोजक डॉ. ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ यांनी सर्व सहभागी कलाकारांचे आभार व्यक्त केले. तसेच सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले व सर्व कलाकारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व स्पर्धेची सांगता केली.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



