दोन राष्ट्रपती पदकाचे मानकरी – विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी साहेब

मंगळवेढा (बारामती झटका)
सामाजिक बांधिलकी म्हणून खाकी वर्दी स्वीकारलेले एक अभ्यासू, कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक, शिस्तप्रिय व्यक्तिमत्व म्हणजे मा. सुनील फुलारी साहेब होय. तर हे आहेत आपल्या कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा. सुनीलजी फुलारी साहेब ! २०२५ सालच्या २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला विशेष उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलीस पदक यांना जाहीर करून गौरवण्यात आले आहे. त्याच दिवशी लगेच यांना अभिनंदन पर थोडक्यात का होईना शुभेच्छा दिल्या आहेतच. नंतर माहिती घेतली तर समजले की ही व्यक्ती छोट्या अभिनंदनच नाही तर खूप मोठ्या अभिनंदन व कौतुकास पात्र आहे. कारण हे राष्ट्रपती पदक त्यांचे दुसरे आहे यापूर्वी देखील त्यांना गुणवत्तेबद्दल २०१३ साली पहिल्यांदा राष्ट्रपती पदक मिळालेले आहे. मग लगेच ठरविले की यांचे सर्व पैलू जनतेसमोर आले पाहिजेत की जेणेकरून आणखी काही जणांना त्यापासून नक्कीच प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल असे मनाशी ठरवून लेख लिहायचे ठरविले. मा. सुनील जी फुलारी हे मूळचे नागपूरचे असून १९९२ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये गडचिरोली चंद्रपूर यासारख्या नक्षलवादी क्षेत्रामध्ये देखील उत्कृष्ट कामगिरी केली आहे. नागपूर सारख्या मोठ्या शहरात उपराजधानी मध्ये देखील बऱ्याच सामूहिक गुन्हेगारी जगतातील टोळ्यावरती अंकुश लावण्यासाठी प्रसंगी मोका, एम पी डी ए अंतर्गत कारवाया करून नियंत्रण मिळविले आहे. त्यामुळे गुन्ह्याच्या संख्येमध्ये घट झाली आहे.
२०२० च्या कोरोना काळामध्ये सुद्धा माणुसकी व सामाजिक बांधिलकी जपत पोलीस हा समाजापासून वेगळा नसतो असा सुखद अनुभव जनतेला दिलेला आहे. मा. सुनील जी यांनी कोल्हापूर, सातारा, मिरज, विशाळगड या ठिकाणच्या जातीय संघर्षामध्ये आणि मराठा आंदोलनामध्ये देखील प्रसंगी कणखर भूमिका घेऊन सलोखा सांभाळण्यात कसर सोडली नाही आणि कोणताही अनुचित प्रकार घडू न देता परिस्थिती उत्तमरीत्या यशस्वीपणे हाताळली आहे. नागपूर जळगाव सांगली पुणे येथे गंभीर व गुंतागुंतीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत त्यामध्येही त्यांचे तपासाचे कौशल्य दिसून येते. मोहल्ला समिती शांतता समिती अशा माध्यमातून व्यवस्थित परिस्थिती हाताळून सलोखा सांभाळण्यात देखील यश मिळविले आहे आणि कोणत्याही प्रकारे वातावरण बिघडू दिले नाही.
कोल्हापूर हे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरती असल्याने आंतरराज्य गुन्हेगारी वरती लक्ष ठेवणे हे देखील एक वेगळेच काम असते. लोकसभा विधानसभा या निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी उत्तम नियोजन केले. चांगल्या पद्धतीने उपाययोजना राबवल्या. पोलिसाबद्दल समाजामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविले. पोलीस हे देखील आपल्याच या समाजाचे एक भाग असतात असा विश्वास निर्माण केला.
अल्पसंख्यांक समाजाचे पदाधिकारी यांच्या गाठीभेटी घेऊन गणपती ईद हे सण शांततेत कसे पार पडतील याबाबत प्रबोधन केले. नवरात्र भीमा कोरेगाव वारी बंदोबस्त निवडणुका सततचा व्हीआयपी बंदोबस्त दौरे यामुळे पोलिसांवर येणारा ताण याचेही अनुभव शिदोरीत बांधून घेतले आहेत. त्यामधून बरेच काही शिकायला मिळते अशी त्यांची भावना आहे.
वन्यजीव प्राणी गुन्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर चालणारी तस्करीमध्ये व्हेल माशा उलटीची तस्करी यावर नियंत्रण मिळवताना ४५ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये मालमत्ता शरीराबाबतचे गुन्हे आर्थिक गुन्हे याच्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी पेट्रोलिंग रस्ता नाकाबंदी रात्रगस्ती पथके अशा मार्गाने नियंत्रण मिळवले त्यामुळे गुन्ह्यामध्ये बऱ्यापैकी घट झाली.
राज्य राखीव दलाची देखील कामगिरी सुधारण्यावर त्यांनी भर दिला. त्यामध्ये देखील आपल्या टीमला ट्रॉफी आणि चॅम्पियनशिप मिळवून देण्यामध्ये देखील सुनीलजी यांचा सिंहाचा वाटा आहे. यांच्याच कार्यकाळात महाराष्ट्रातील उत्कृष्ट पोलीस ठाणे बाबतीत पाच पैकी दोन पोलीस ठाणे ही आपल्या कोल्हापूर परिक्षेत्रातील शिवाजीनगर व शिरोळ अशी दोन आहेत, आहे ना अभिमानाची गोष्ट !
मा. सुनील जींची प्रतिमा पहिल्यापासूनच प्रामाणिक शिस्तप्रिय अधिकारी म्हणून आहे आणि ती त्यांनी आजवर यशस्वीरित्या जपली आहे. पोलीसिंग म्हणजे काय याबाबत त्यांचा उत्तम अभ्यास आहे त्यामुळे ते यशस्वी होत असतात. त्यांनी काम केलेल्या जळगाव नागपूर नाशिक संभाजीनगर (औरंगाबाद) अनेक ठिकाणी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. अनेक ठिकाणी शूटिंगसाठीची देखील मेडल्स मिळवली आहेत. तर कोची केरळ येथे देखील बॅडमिंटन साठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. युके केंब्रिज विद्यापीठात देखील वैयक्तिक बक्षिसे मिळवली आहेत. कोईमतुर येथे इनर इंजीनियरिंग मध्ये देखील लीडरशिप केली आहे.
त्यांनी कोल्हापूर मध्ये चार्ज घेताना सत्यमेव जयते या बोधवाक्यावरूनच कामकाज होईल असे स्पष्ट केले होते व त्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे. त्यांच्या आयुष्यात त्यांनी स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श स्थानी मानत असल्याचे नमूद केले आहे. आम्हाला अभिमान आहे की आपल्या कोल्हापूर परीक्षेत्रा साठी दोन वेळा राष्ट्रपती पदक मिळविलेला अधिकारी मा. सुनीलजी फुलारी साहेब यांच्या रूपाने मिळाला आहे.
खाकी वर्दीचा जनतेला आधार वाटला पाहिजे, भीती नाही वाटली पाहिजे, या मार्गाने आपण मार्गक्रमण करीत असल्याने नक्कीच यापेक्षा उंच यशाची शिखरे सर करावीत अशा शुभेच्छा !
जय हिंद ! जय हो महाराष्ट्र पोलीस !
ॲड. रमेश दिनानाथ जोशी, मंगळवेढा
मो.नं. ८२७५५०६०५०
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.