Uncategorizedताज्या बातम्याराजकारण

उंबरे दहिगाव ग्रामपंचायतीच्या बिनविरोध उपसरपंचपदी बापू गोविंद ढेकळे यांची निवड.

माजी सरपंच विष्णुपंत नारनवर यांच्या नेतृत्वाखाली मागच्या वेळीपेक्षा तिप्पट विकास करून सत्तेची हॅट्रिक करणार – राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय ढेकळे

माळशिरस ( बारामती झटका )

उंबरे दहिगाव ता. माळशिरस या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बिनविरोध श्री. बापू गोविंद ढेकळे यांची निवड माजी सरपंच विष्णुपंत नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच शोभाताई विजय ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे.

उंबरे दहिगाव ग्रामपंचायतीच्या चुरशीच्या व रंगतदार निवडणुकीत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष माजी सरपंच सोपानकाका नारनवर यांच्या गटाचा धुराळा उडवून राष्ट्रवादीचे नेते माजी सरपंच विष्णुपंत नारनवर गटाचे थेट जनतेतील सरपंच शोभाताई विजय ठोंबरे, ग्रामपंचायत सदस्य बापू गोविंद ढेकळे, शोभाताई दत्तू वाघमोडे, सुनीता भिमराव समिंदर, सुषमा विष्णूपंत नारनवर, साई रामचंद्र ठोंबरे, कलावती ज्ञानदेव बोडरे, दौलत गणपत ढोबळे, नवनाथ अनंता वाघमोडे यांनी दैदिप्यमान विजय मिळवलेला होता.

करमाळा विधानसभेचे आमदार संजयमामा शिंदे, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष गुळवे, सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सुरेशआबा पालवे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सरपंच युवा नेते विष्णुपंत नारनवर यांच्या नेतृत्वाखाली मागील पाच वर्षात जो विकास केला, त्यामुळे जनतेने दुसऱ्यांदा संधी दिलेली आहे. येणाऱ्या पाच वर्षाच्या कालावधीत मागच्या वेळीपेक्षा तिप्पट विकास करून गावामध्ये पाणी, रस्ते, आरोग्य, शाळा यावर भर देऊन पुढच्या निवडणुकीत विजयाची हॅट्रिक पूर्ण करणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय ढेकळे यांनी सांगितले.

उंबरे दहिगाव ग्रामपंचायतीच्या थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच शोभाताई विजय ठोंबरे व बिनविरोध उपसरपंच पदी बापू गोविंद ढेकळे यांची निवड झाल्यानंतर उत्साही कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण फटाक्यांची आतीषबाजी करून आनंद उत्सव साजरा केला. यावेळी वाजत गाजत सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, गावातील नेते, कार्यकर्ते व उत्साही तरुणांनी जल्लोष करीत ग्रामदैवतांचा आशीर्वाद घेतला.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button