डोर्लेवाडी येथे चैतन्य जप प्रकल्पाचे रौप्य महोत्सवी राज्यस्तरीय शिबिराचे आयोजन

नंदकुमार जोशी व धैर्यशील देशमुख यांच्या उपस्थितीत होणार संपन्न
डोर्लेवाडी (बारामती झटका)
डोर्लेवाडी, ता. बारामती येथे चैतन्य जप प्रकल्प महाराष्ट्र राज्य चे 25 वे रौप्य महोत्सवी राज्यस्तरीय शिबिर 2025 चे आयोजन दि. 24, 25, 26 ऑक्टोबर 2025 रोजी श्री ब्रह्मचैतन्य नगरी डोर्लेवाडी, ता. बारामती, जि. पुणे येथे करण्यात आले आहे. यावेळी चैतन्य जप प्रकल्प कार्यालय धनकवडीचे अध्यक्ष नंदकुमार श्रीपाद जोशी व नातेपुते चैतन्य जप प्रकल्प कार्यालयाचे कार्याध्यक्ष धैर्यशील मुधोजीराव देशमुख यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

तसेच कारभार विभाग प्रमुख राजेंद्र आगवणे, प्रचार व प्रसार विभाग प्रमुख गणपत जगताप (गुरुजी), विश्वस्त साहेबराव देशमुख, अर्थ विभाग प्रमुख विजय लोंढे, विश्वस्त कुमारी पद्मशा देव, विश्वस्त अर्जुन जाधव हेही उपस्थित राहणार आहेत तरी पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी सदर शिबीरास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



