ताज्या बातम्याराजकारण

डॉ. आप्पासाहेब देशमुख यांनी राजकीय स्टिंग ऑपरेशन करून कमळाच्या पाकळ्या घट्ट केल्या…

उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी माळशिरस तालुक्यात लोकसभेच्या निवडणुकीत केलेल्या भरीव कार्याचे कौतुक केले..

माळशिरस (बारामती झटका )

श्रीनाथ विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब एकनाथ देशमुख यांनी माढा लोकसभेच्या निवडणुकीत माळशिरस तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या विस्कटलेल्या कमळाच्या पाकळ्या राजकीय स्टिंग ऑपरेशन करून माळशिरस तालुक्यात कमळाच्या पाकळ्या घट्ट केलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी डॉ. आप्पासाहेब देशमुख यांना माळशिरस तालुक्यात लोकसभेच्या निवडणुकीत केलेल्या भरीव राजकीय कार्याचे कौतुक केलेले आहे.

देशाच्या व राज्याच्या राजकीय पटलावर माढा लोकसभा मतदारसंघाची चर्चा झालेली आहे याला कारणही तसेच आहे. माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडून भाजपकडे येत असताना मोहिते पाटील व मोहिते पाटील पारंपारिक विरोधी गट यांनी माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खा. रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा होता. मात्र, या निवडणुकीत मोहिते पाटील व मोहिते पाटील पारंपारिक विरोधक एकत्र येऊन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात दंड थोपटलेला होता. त्यामुळे माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील व मोहिते पाटील विरोधी गट एकत्र झालेले असल्याने तालुक्यात भारतीय जनता पक्षाचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावर मोठी जबाबदारी आलेली होती. मात्र, जबाबदारीने व धाडसाने कोणीतरी आधारवड असावा, अशी सर्वसामान्य व गोरगरीब मतदारांची अपेक्षा होती. तीच अपेक्षा माजी नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख यांनी लोकसभेच्या निवडणुकीत दाखवून दिलेली आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत देशाचे पंतप्रधान विकासरत्न नरेंद्रजी मोदी यांच्या माळशिरस येथे विजयी संकल्प सभेचे आयोजन केलेले होते. सदरच्या सभेचे नियोजन माण-खटाव चे कार्यतत्पर आ. जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ यांच्याकडे होती‌. त्यांनी डॉ. आप्पासाहेब देशमुख यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पाडलेली आहे. डॉ. आप्पासाहेब देशमुख यांनी माळशिरस शहर व आसपासच्या 40 ते 50 गावांमध्ये योग्य नियोजन लावलेले होते. शहरातील व ग्रामीण भागातील लोकांना डॉ‌. आप्पासाहेब देशमुख यांचा आधार वाटल्याने अनेक कार्यकर्ते राजकीय दबाव असताना सुद्धा उघड उघड खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी ठाम उभा राहिलेले आहेत. त्यामुळे मोहिते पाटील व मोहिते पाटील पारंपारिक विरोधी गट एकत्र येऊन सुद्धा डॉ. आप्पासाहेब देशमुख यांनी माळशिरस तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या विस्कटलेल्या कमळाच्या पाकळ्या राजकीय स्टिंग ऑपरेशन करून घट्ट केलेल्या आहेत. या कार्याची भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दखल घेतलेली आहे.

सध्या डॉ. आप्पासाहेब देशमुख भाजपचे विशेष निमंत्रित सदस्य आहेत. भविष्यात भारतीय जनता पक्षाची मोठी जबाबदारी येऊ शकते, अशीही डॉक्टर आप्पासाहेब देशमुख यांच्या समर्थकांमध्ये चर्चा सुरू असतानाच महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी डॉ. आप्पासाहेब देशमुख यांच्या केलेल्या कार्याचे गौरव करण्याकरता फोन वरून संपर्क साधलेला असल्याने डॉ. आप्पासाहेब देशमुख समर्थकांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

5 Comments

  1. Excellent insights! Your breakdown of the topic is clear and concise. For further exploration, I recommend visiting: READ MORE. Keen to hear everyone’s opinions!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button