ऐतिहासिक कार्याच्या माध्यमातून लोकनेते सूर्यकांतदादांनी जनसेवा जपली – पांडुरंगभाऊ माने देशमुख
अकलूज (बारामती झटका)
लोकनेते स्वर्गीय सूर्यकांतदादा माने देशमुख यांनी आपले जीवन समाजसेवेसाठी समर्पित केले होते. जनसेवेचा ध्यास घेऊन त्यांनी ऐतिहासिक कार्य केले. त्यामुळे आजही त्यांच्या कार्याला उजाळा मिळताना दिसतो आहे, असे मत वेळापूर येथील आदर्शवत व्यक्तिमत्व तथा श्री महादेव देवालय ट्रस्टचे ट्रस्टी पांडुरंगभाऊ माने देशमुख यांनी व्यक्त केले.
लोकनेते स्वर्गीय सूर्यकांत माने देशमुख यांच्या जयंतीनिमित्त वेळापूर ग्रामस्थांच्यावतीने विकास सेवा सोसायटी या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अभिवादन सभेत ते बोलत होते. याप्रसंगी सुरुवातीला जयंतीनिमित्त लोकनेते सूर्यकांत माने देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी पत्रकार सुर्यकांत भिसे यांनी अनेक आठवणी सांगितल्या.
यावेळी विकास सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन महादेव ताटे, कै. सूर्यकांतदादांचे ज्येष्ठ चिरंजीव तथा श्री महादेव देवालय ट्रस्टचे अध्यक्ष अमृतभैया माने देशमुख, मार्केट कमिटीचे संचालक बाळासाहेब माने देशमुख, सोसायटीचे संचालक दत्तात्रय माने, श्रीधरराव देशपांडे, विश्वजीत माने देशमुख, ग्रामपंचायत सदस्य दीपक राऊत, ॲड. ताटे, शरद साळुंखे, राजकुमार बनसोडे, मोहन आडत, पत्रकार सूर्यकांत भिसे, अनंत क्षीरसागर, विश्वास वाघे, रंगनाथ माने आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी लोकनेते सूर्यकांतदादाचे विश्वासू सहकारी तसेच वेळापूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकनेते स्व. सुर्यकांतदादा यांच्या आठवणींना मिळाला उजाळा…
सोलापूर जिल्हा परिषदेचे सुर्यकांतदादा उपाध्यक्ष असताना शेतकऱ्यांसाठी विविध योजना त्यांनी राबविल्या. आपल्या दातृत्वातून त्यांनी अनेकांचे संसार फुलवले. वेळापूर येथे ऐतिहासिक निर्णय घेत महावितरण ला जागा देणे, पाण्याचा प्रश्न मिटावा यासाठी तळे बांधण्यासाठी देखील त्यांनी जागा दिली. शाळा, बंधारे, समाजमंदिरे, हातपंप अशा माध्यमातून त्यांनी आपल्या कार्याची ओळख निर्माण केली.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Hello, great post! However, there’s an issue with your website when viewed in Internet Explorer. It’s important to address this since IE is still a leading browser, and many users may miss out on your excellent writing because of it.