सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचा हेलीकाॅप्टरने माळशिरस तालुक्यात नियोजन दौरा
श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ व आसवानी प्रकल्प विस्तारीकरण उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते तर खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार
माळशिरस ( बारामती झटका )
श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना लि. श्रीपुर ता. माळशिरस या कारखान्याचा सन 2022 -23 चा 32 वा गळीत हंगाम शुभारंभ व आसवानी प्रकल्प विस्तारीकरण उद्घाटन महसूल दुग्धविकास पशुसंवर्धन मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री.राधाकृष्ण विखे पाटील यांचे शुभहस्ते आणि माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली व अनेक लोकप्रतिनिधी मान्यवरांच्या उपस्थितीत रविवार दि. 16/10/2022 रोजी सकाळी 10.00 वा. कारखाना कार्यस्थळावर संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रमासाठी माळशिरस तालुक्यात पालकमंत्र्यांचे हेलीकाॅप्टरने आगमन होणार आहे.


साखर उद्योग व्यवसायामध्ये प्रगती करून शिरपेचात मानाचा तुरा रोवलेल्या श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाने एसटी महामंडळाचे अध्यक्ष पंढरपूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार स्वर्गीय श्रीमंत सुधाकरपंत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पुरस्कार प्राप्त केलेले आहेत.
देश पातळीवरील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना म्हणून गौरविलेला व महाराष्ट्र शासनाचा वनश्री व सहकार भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संपन्न होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन विधान परिषदेचे माजी आमदार व कारखान्याचे विद्यमान चेअरमन प्रशांतराव परिचारक, व्हाईस चेअरमन कैलास खुळे, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, सर्व संचालक मंडळ, सभासद युनियन, पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी वृंद यांच्यावतीने करण्यात आलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

