ताज्या बातम्यासामाजिक

इलेक्ट्रिक स्कूटरवर वीज कोसळून एक जणाचा मृत्यू तर दोन गंभीर जखमी

फलटण (बारामती झटका)

वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक भागात नुकसान केले. सातारा, फलटण तालुक्यातही विजांसह पाऊस झाला. फलटण येथील सरडे गावात एका ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज पडून एकाचा मृत्यू तर दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.

फलटण येथील आयटीआयचे ३ विद्यार्थी ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवरुन जात होते. यावेळी अचानक विजांच्या कडकडाटसह पावसाला सुरूवात झाली. चालत्या ओला स्कूटरवर विज पडली आहे. जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

याबाबत सविस्तर मिळालेली माहिती अशी, ११ मे रोजी रोजी सायंकाळी सरडे, ता. फलटण, जि. सातारा येथे वीज पडून मोटरसायकल वरील एकाचा मृत्यू व दोन जण जखमी झाले आहेत. दोन्ही जखमींवर गिरीराज हॉस्पिटल, बारामती येथे उपचार चालू आहेत व त्यांची प्रकृती स्थिर आहे. विक्रम विजय धायगुडे (रा. सरडे, ता. फलटण, जि. सातारा, वय १७), प्रथमेश सुनील भिसे (वायसेवाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर, वय १७), मयत नामे ज्ञानेश्वर गहिनीनाथ ढोले (वय १७, रा. वंजारवाडी, खर्डा, ता. जामखेड, जि. अहमदनगर) वरील तिन्ही विद्यार्थी आयटीआय शारदानगर येथे शिक्षण घेत होते.

मोटर सायकलवर वीज पडलेली पहिलीच घटना असावी इलेक्ट्रॉनिक गाडी असल्याने वीज पडली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button