ताज्या बातम्याराजकारण

लेकुराचे हित पाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभाविन प्रीती, या ओळीचा प्रत्यय प्रतापगडावर पाहावयास मिळाला…

पितृत्व व मातृत्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या पद्मजादेवी मोहिते पाटील उर्फ आईसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा संघटना गतवैभव प्राप्त करेल…

धवलनगर (बारामती झटका)

माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह शंकरराव मोहिते पाटील यांनी जीवात जीवमान असे तोवर जनसेवाच करू, या ब्रीदवाक्याने स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या नूतन पदाधिकारी जिल्हा परिषद गट अध्यक्ष व पंचायत समिती गण अध्यक्ष, नगर परिषद व नगरपंचायत वार्ड अध्यक्ष व कार्यकर्त्यांचा प्रशिक्षण शिबिर रविवार दि. 20/07/2025 रोजी प्रतापगड, धवलनगर येथे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर व नियुक्ती पत्राचे वाटप महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सोलापूर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य युवा नेते डॉक्टर धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र वाटप करण्यात आले. यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी विरोधी पक्षनेत्या व पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या सिनेट सदस्या पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते पाटील उर्फ आईसाहेब यांनी महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या राज्य कार्यकारणी सदस्य पदाचे पत्र चिरंजीवाच्या हस्ते स्वीकारताना,
लेकुराचे हित,
पाहे माऊलीचे चित्त.
ऐसी कळवळ्याची जाती,
करी लाभाविण प्रीती.
पोटी भार वाहे,
त्याचे सर्वस्वही साहे,
तुका म्हणे माझे,
तुम्हा संतावरी ओझे.

या अभंगाचा प्रत्यय धवलनगर प्रतापगडावर पाहावयास मिळाला. लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या पश्चात पितृत्व व मातृत्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या पद्मजादेवी मोहिते पाटील उर्फ आईसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा संघटना गतवैभव प्राप्त करेल, असा विश्वास उपस्थित नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव सांगून जात होता.

लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांना उच्च शिक्षण देऊन शेती व्यवसायामध्ये डॉक्टरेट पदवी प्रदान केलेली आहे. लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी धवलदादांना त्याकाळी सुद्धा प्रदेशाध्यक्षपद बहाल केले असते परंतु, सिंहाचा छावा तयार करीत असताना पप्पासाहेबांनी धवलदादांकडे धवलसिंह युवा मंचचे पद दिलेले होते. त्यानंतर महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे युवक अध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली होती. धवलदादांनी दोन्ही पदाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळून जनसेवा संघटनेचे वर्म जाणून घेतलेले होते.

पप्पासाहेब व आईसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली धवलदादा जिल्हा परिषदेचे सदस्य झालेले होते. जिल्हा परिषदेमध्ये पहिले पाऊल टाकत असताना दादांचे प्रतापगडापासून जिल्हा परिषदेपर्यंत जंगी स्वागत केलेले होते. जिल्हा परिषदेमध्ये सभागृहात धवलदादांनी प्रश्नाचा भडिमार केलेला होता. त्यावेळेस पप्पासाहेबांना आनंद झालेला होता. आपला छावा सुद्धा आपल्यासारखाच तयार झालेला आहे.

पप्पा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा संघटनेने अनेक विश्वविक्रम केलेले आहेत. त्यामध्ये रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, असे अनेक समाज उपयोगी कार्यक्रम केले जात होते. शेतकरी मेळावा घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी सोडविण्यासाठी सरकारला वेळप्रसंगी धारेवर सुद्धा धरले जात होते. अशी जनसेवा संघटनेची वेगळी ओळख होती. जनसेवा संघटनेच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते घडलेले आहेत. जनसेवा संघटनेचे अनेक पदाधिकारी, मंत्रिमंडळ, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती, विविध संस्थांवर सर्वोच्च पदावर पोहोचलेले होते.

जनसेवा संघटनेचे पदाधिकारी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहेत. पप्पा साहेबांच्या आजारपणाच्या वेळी राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळाली. घरातूनच राजकारण झालेले असल्याने प्रतापगडाच्या राजकारणाला जसे सूर्याला व चंद्राला ग्रहण लागते तशा पद्धतीने राजकीय परिस्थिती निर्माण झालेली होती. परंतु, आईसाहेब व दादासाहेब यांनी न डगमगता निष्ठावान व सच्चा कार्यकर्त्यांच्या जोरावर महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना पुनर्बांधणी सुरू केलेली आहे. पप्पा साहेबांनी लोकसभेचा राजीनामा देऊन देशामध्ये वेगळा ठसा उमटविला होता. तोच वसा आणि वारसा घेऊन डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन प्रतापगडाचा वारसा जपलेला, महाराष्ट्राने पाहिलेला आहे. पप्पासाहेब यांनी महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताकद व बळ दिलेले होते, त्याचाच धागा पकडून डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी जनसेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारलेले आहे.

डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील उर्फ दादासाहेब प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सांभाळत असताना पितृत्व व मातृत्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या आईसाहेब राज्य कार्यकारणी सदस्य झालेल्या आहेत. त्यांच्यासोबत सुनबाई सौ. उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील व नातू निहानसिंह धवलसिंह मोहिते पाटील, नात इलाक्षीदेवी धवलसिंह मोहिते पाटील असे परिवारातील जनसेवा संघटनेचे पदाधिकारी झालेले आहेत. पुन्हा एकदा नेते, कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी प्रतापगड फुलून गेलेला होता. अनेकांनी आपले मनोगते व्यक्त केली. निश्चितपणे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका , नगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत यामध्ये जनसेवा संघटनेच्या संघटनात्मक बांधणीमुळे आईसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या योग्य नियोजनामुळे जनसेवा संघटना गतवैभव प्राप्त करेल, असा कार्यकर्त्यांचा विश्वास बळावलेला आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom