ताज्या बातम्याराजकारण

“चर्चा तर होणारच” मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते कर्मयोगी श्रीमंत सुधाकरपंत परिचारक पुतळा उद्घाटन कार्यक्रमातील लुडबुड…

शेजाऱ्याच्या लग्नात सुनेचं डोहाळ जेवण याचीही सीमा ओलांडून घराण्याची इज्जत कुठे नेऊन ठेवली, अशी पंढरपूरकरांमध्ये चर्चा सुरू आहे..

पंढरपूर (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते व अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते कर्मयोगी श्रीमंत सुधाकरपंत परिचारक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण श्रीपुर तालुका माळशिरस येथील कारखाना प्रशासकीय कार्यालयासमोर उद्घाटन समारंभाचे आयोजन केलेले होते. मात्र, पुतळा उद्घाटन समारंभाच्या वेळी कार्यक्रमांमध्ये कारखाना कसा बंद पडेल, जाणीवपूर्वक त्रास देऊन स्व. सुधाकरपंत मालक यांना नेहमी टार्गेट करणाऱ्या मंडळींची लुडबुड सुरू होती. शेजाऱ्याच्या लग्नात सुनेचं डोहाळ जेवण, अशी ग्रामीण भागामध्ये म्हण प्रचलित आहे परंतु, याचीही सीमा ओलांडून घराण्याची इज्जत कुठे नेऊन ठेवली अशी पंढरपूरकरांमध्ये खुमासदार चर्चा सुरू आहे…

महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ, आजी-माजी खासदार, आमदार यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. विशेष करून स्वर्गीय कर्मयोगी श्रीमंत सुधाकरपंत परिचारक यांच्यावर नितांत प्रेम करणारे पंढरपूर तालुक्यातील जुनेजाणते, तरुण, युवक व माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंढरपूरकरांचे बारीक लक्ष होते. कर्मयोगी यांचा पुतळा उद्घाटन व सभेच्या ठिकाणी लुडबुड करणाऱ्यांची हालचाल व हावभाव बघून जनतेमध्ये कुजबुज सुरू होती. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस राज्यातील कार्यक्रम वगळता मुंबई येथे कायम असतात. अशावेळी लोकप्रतिनिधींना भेटत असतात, चर्चा करतात, निवेदने घेतात. मात्र, मुख्यमंत्री पहिल्यांदाच भेटलेत अशा पद्धतीने मंडळींची व्यासपीठावर धावपळ सुरू होती. मुख्यमंत्री मुंबईमध्ये यांना वेळ देत नाहीत का, असाही प्रश्न पंढरपूरकरांना पडलेला होता. सुधाकरपंत परिचारक यांना अर्वाच्य शब्दांमध्ये बोलणारे आज गुणगान गाताना दिसत असल्याने पाठीमागील केलेले कर्म आम्ही कधीच विसरणार नाही, अशी पंढरपूरकरांमधून भावना व्यक्त होत होती.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom