ताज्या बातम्या

एटीएम चोरीच्या घटनेत चोर जेरबंद करण्यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणेचा प्रभावी वापर

माढा (बारामती झटका)

मंगळवार दि. ०३ ऑक्टबर रोजी माढा पोलिस स्टेशन हद्दीत ता. माढा, जि. सोलापूर, गावात सकाळी ८.३० वाजता अहमदनगर जिल्ह्यातुन एक पिकअप गाडीमध्ये एटीएम चोरून सात चोर माढा पोलीस स्टेशन हद्दीत आलेले आहेत. हे कळताच सोलापूर लोकल क्राइम ब्रांच चे पोलीस इन्स्पेक्टर सुरेश निंबाळकर यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाइन १८००२७०३६०० नंबरवरून ही माहिती सोलापूर जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी तात्काळ आपल्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नाकाबंदी लावावी. व सर्व नागरिकांना सतर्क राहण्याबद्दल कळवले आणि माढा पोलीस स्टेशन हद्दीतील वाकाव आणि विठ्ठलवाडी हद्दीत सदर पिकअप असल्याची चाहूल लागताच सदर दोन्ही गावच्या पोलीस पाटील यांनी तात्काळ गावातील सर्व नागरिकांना ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून सदर माहिती कळवली.

सदर घटना गंभीर असल्याने मा. पोलीस अधीक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे साहेब, माढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बी. एम. खनदाळे घटनास्थळी दाखल झाले. चोरट्यांच्या शोधासाठी विविध पथके तैनात करण्यात आली आणि गॅस कटरने एटीएम मशीन कट करून सर्व रक्कम काढून विठ्ठलवाडी गावाच्या हद्दीत फेकून दिलेली आढळुन आली. वाकावमध्ये पिकअप गाडी सापडली. आणि खैराव, कुंभेज, लोंढेवाडी, वाकाव स्टेशन जवळ या सर्व ठिकाणी मिळून 7 चोरांपैकी 4 चोर जेरबंद करण्यात माढा पोलिसांना यश आले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button