खुडूस येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन

खुडूस (बारामती झटका)
खुडूस ता. माळशिरस, येथे समस्त ग्रामस्थ खुडूस व खुडूस परिसरातील सर्व भाविकांच्या सहकार्याने व ह. भ. प. किसन महाराज डोंबाळे यांच्या प्रेरणेने अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन मंगळवार दि. २१/५/२०२४ ते मंगळवार दि. २८/५/२०२४ या दिवशी हनुमान मंदिर, खुडूस येथे करण्यात आले आहे.
या सप्ताहामध्ये पहाटे ४ ते ६ काकडा, ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, ११ ते १२ गाथा भजन, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, ६ ते ७ प्रवचन, रात्री ९ ते ११ कीर्तन व नंतर हरिजागर असा दैनंदिन दिनक्रम असणार आहे. या सोहळ्याचे यंदाचे २८ वे वर्ष आहे.
मंगळवार दि. २१/५/२०२४ रोजी कै. संभाजी तात्या वाघ यांच्या स्मरणार्थ श्री. आनंद संभाजी वाघ व ह. भ. प. कै. महादेव पांडुरंग वाघ यांच्या स्मरणार्थ श्री. पंकज भारत वाघ यांच्या सौजन्याने ह. भ. प. श्रीकृष्ण महाराज भगत, नातेपुते यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न होणार आहे. तर या दिवशी सकाळचा नाश्ता सोपान वाघ यांच्या वतीने देण्यात येणार आहे. तर याच दिवशी दुपारचे अन्नदाते नवनाथ ठवरे व सायंकाळचे अन्नदाते तानाजी ठवरे हे असणार आहेत. बुधवार दि. २२/५/२०२४ रोजी ज्योतीराव भागवत वाघ रणजीत कृषी केंद्र, खुडूस यांच्या सौजन्याने ह. भ. प. भागवत महाराज चवरे, पंढरपूर यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. तर या दिवशी सकाळचा नाश्ता मोहन जोशी, अविनाश कांबळे यांच्या वतीने देण्यात येणार आहे. तर याच दिवशी दुपारचे अन्नदाते मारुती माने व सायंकाळचे अन्नदाते रावसो पांढरे हे असणार आहेत. गुरुवार दि. २३/५/२०२४ रोजी कै. हनुमंत लक्ष्मण घोगरे यांच्या स्मरणार्थ श्री. विजय हनुमंत घोगरे यांच्या सौजन्याने ह. भ. प. मंगेश महाराज माने देशमुख, तोंडले यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. तर या दिवशी सकाळचा नाश्ता भीमराव बुधनवर आणि विठ्ठल शिंदे यांच्या वतीने देण्यात येणार आहे. तर याच दिवशी दुपारचे अन्नदाते उद्धव ठवरे आणि सायंकाळचे अन्नदाते राजेंद्र ठवरे हे असणार आहेत. शुक्रवार दि. २४/५/२०२४ रोजी श्री. दीपक ज्योतीराम वाघ बँक ऑफ बडोदा ॲग्री ऑफिसर, अकलूज यांच्या सौजन्याने ह. भ. प. गुरुवर्य बंडातात्या महाराज कराडकर यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. तर या दिवशी सकाळचा नाश्ता किशोर वेदपाठक यांच्या वतीने देण्यात येणार आहे. तर याच दिवशी दुपारचे अन्नदाते रावजी लोखंडे तर सायंकाळचे अन्नदाते माणिक ठवरे हे असणार आहेत.

शनिवार दि. २५/५/२०२४ रोजी विक्रम टेळे सद्गुरु मेडिकल, डॉ. अमित काळे, माणिक ठवरे, ॲड. सिताराम झंजे यांच्या सौजन्याने ह. भ. प. मोहन काका पाटील घोटीकर महाराज सांगली यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. तर याच दिवशी सकाळचा नाष्टा हनुमंत शिंदे व बबन भुजबळ यांच्या वतीने देण्यात येणार आहे. तर याच दिवशी दुपारचे अन्नदाते सतीश कुलाळ व सायंकाळचे अन्नदाते सुरेश बोंद्रे हे असणार आहेत. रविवार दि. २६/५/२०२४ रोजी कै. तानाजी चौगुले यांच्या स्मरणार्थ श्री. शंकर चौगुले कॉन्ट्रॅक्टर यांच्या सौजन्याने ह. भ. प. विकास महाराज देवडे, गणेशवाडी यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. तर या दिवशी सकाळचा नाश्ता चंद्रकांत लोंढे व नानासो पांढरे यांच्या वतीने देण्यात येणार आहे. तर याच दिवशी दुपारचे अन्नदाते राजेंद्र क्षीरसागर व सायंकाळचे अन्नदाते गोविंद चौगुले हे असणार आहेत. सोमवार दि. २७/५/२०२४ रोजी श्री. सुरज वाघ, डॉ. चेतन शिंदे, महेश बाबर, तानाजी ठवरे, शकील पठाण यांच्या सौजन्याने ह. भ. प. समाजभूषण विलास मदने महाराज, राहुरी यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. तर या दिवशी सकाळच्या नाश्ता केरबा गोरवे गुरुजी यांच्यावतीने देण्यात येणार आहे. तर दुपारचे अन्नदाते युवराज चोरमले व सायंकाळचे अन्नदाते मारुती कुलाळ हे असणार आहेत. तर याच दिवशी दुपारी ४ वाजता भव्य दिंडी सोहळा व घोड्याचे रिंगण होणार आहे. मंगळवार दि. २८/५/२०२४ रोजी सकाळी ९.३० ते ११.३० यावेळेत ह. भ. प. लक्ष्मण महाराज कोकाटे यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. तर या दिवशी सकाळचा नाष्टा हनुमंत कपने यांच्यावतीने देण्यात येणार आहे. तसेच या दिवशी ज्ञानोबा ठवरे, गंगाधर वाघ, धनाजी ठवरे, संदीप कुलकर्णी आणि राजेंद्र कावरे यांच्या वतीने महाप्रसाद देण्यात येणार आहे.
तरी खुडूस पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी व समस्त ग्रामस्थांनी अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात उपस्थित राहून याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा