ताज्या बातम्यासामाजिक

फडतरी येथे तुळजाभवानी यात्रेनिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन….

फडतरी (बारामती झटका)

फडतरी ता. माळशिरस, येथे सालाबादप्रमाणे तुळजाभवानी यात्रेनिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन तुळजाभवानी यात्रा कमिटी व समस्त ग्रामस्थ फडतरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

तुळजाभवानी यात्रेस बुधवार दि. 16/10/2024 रोजी संध्याकाळी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सायंकाळी 8.30 वाजता आर्केस्ट्रा कार्यक्रम सुरू होणार आहे. गुरुवार दि. 17/10/2024 रोजी सकाळी 9 वाजता डोळे तपासणी शिबिर होणार आहे. सकाळपासून गजी ढोल खेळाचा कार्यक्रम सुरू राहणार आहे. दुपारी गजी खेळणारे व ग्रामस्थांना जेवण केले जाणार आहे.

शुक्रवार दि. 18/10/2024 रोजी सकाळी आठ वाजलेपासून बकरी बलिदानाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. रात्री साडेआठ वाजता रघुवीर खेडकर यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे. शनिवार दि. 19/10/2024 रोजी पहाटे 5 वाजता तुळजाभवानी मंदिरापासून पालखी सोहळा निघणार आहे. तरी फडतरी पंचक्रोशीतील व फडतरी गावातील समस्त नागरिक, भाविकभक्त यांनी यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवून यात्रेची शोभा वाढवावी, असे तुळजाभवानी यात्रा कमिटी व समस्त ग्रामस्थ फडतरी यांच्यावतीने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button