क्रीडाताज्या बातम्या

फलटण नगर परिषदेचे नगरसेवक अशोकराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धेचे आयोजन…

मलटण येथे भव्य फुलपिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

मलटण (बारामती झटका)

मलटण येथे नगरसेवक अशोकराव जाधव उर्फ काका यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनव महाराष्ट्र मित्र मंडळ व शिवतेज क्रिकेट क्लब मलटन यांच्यावतीने भव्य फुलपिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दि. ६/१२/२०२४ ते दि. ८/१२/२०२४ या दिवशी कै. लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर क्रीडा संकुल मलटण, श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल समोर मलटण येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे यंदाचे चौथे वर्ष आहे.

या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस चि. विहान भोसले पाटील यांच्या वतीने ३५ हजार रु., द्वितीय क्रमांकाचे बक्षीस जयवंत शिंदे यांच्या वतीने २५ हजार रु., तृतीय क्रमांकाचे बक्षीस स्वप्निल पवार साहेब यांच्या वतीने १५ हजार रु., चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस दीपक देशमुख यांच्या वतीने ७ हजार रु. देण्यात येणार आहे. तसेच संग्राम सावंत यांच्या वतीने मॅन ऑफ द मॅच – चषक रिजवान खान यांच्या वतीने मॅन ऑफ द सिरीज – सायकल देण्यात येणार आहे. त्याचबरोबर ओंकार भोसले यांच्या सौजन्याने बॉल बॉक्स व सचिन अहिवळे आणि संदीप घाडगे यांच्या सौजन्याने टी-शर्ट देण्यात येणार आहेत.





या स्पर्धेमध्ये निखिल वायदंडे यांच्यावतीने सलग तीन विकेट मिळवणाऱ्या स्पर्धकास चषक, अक्षय कुचेकर यांच्यावतीने सलग सहा षटकार मारणाऱ्या स्पर्धकास चषक आणि सिद्धेश कापसे यांच्यावतीने सलग सहा चौकार मारणाऱ्या स्पर्धकास चषक देण्यात येणार आहे. सदर स्पर्धेचे समालोचन तुकाराम गुलदगड मेजर हे करणार आहेत या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी संग्राम सावंत ९३२५३८०७८०, रवी माने ८७८८७२७३२४, माऊली शिंदे ९१५८७३३७४४, कैलास पवार ९६०४०४३६६१ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त क्रिकेट प्रेमींनी या भव्य क्रिकेट स्पर्धेस उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

6 Comments

Leave a Reply

Back to top button