कृषिवार्ताताज्या बातम्या

शेतकऱ्यांचे डीपी चोरणाऱ्यांचे वकीलपत्र घेऊ नये बार असोसिएशन अध्यक्षांकडे शेतकऱ्यांची धाव

फलटण (बारामती झटका)

फलटण येथील शेतकऱ्यांनी शेतकरी डीपी चोरी करणाऱ्या आरोपींचे वकीलपत्र न घेण्याबाबत वकील बार असोसिएशन फलटणच्या अध्यक्षांना पत्र लिहिले आहे.

सदर पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, आपल्या फलटण तालुक्यात डिपी चोरीचा प्रश्न अतिशय गंभीर झाला आहे. डिपी चोरीने शेतकरी आर्थिक दृष्ट्या मेटाकुटीला आलेला आहे. शेतकरी हा खरंतर जगाचा पोशिंदा म्हटला जातो. पण, त्याच्यावरच आज उपासमारीची वेळ आलेली आहे. कित्येक डिपी चोऱ्या आजपर्यंत फलटण तालुक्यात झालेल्या आहेत. परंतु डिपी चोरी काही थांबता थांबेना. फलटण तालुका प्रशासन पुर्णपणे असमर्थ ठरत आहे, हे स्पष्ट दिसत आहे. कशीतरी एक चोरी दि. 09/12/2024 रोजी पोलीसांनी शोधली आहे.

तरी त्या सापडलेल्या आरोपीचे वकील पत्र आपण घेऊ नये. व फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांना सबळ करण्याकरीता सहकार्य करावे, अशी आपणांस व आपल्या सर्व सहकारी वकील व वकील बार असोसिएशन फलटण तालुका यांना फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करण्यात आली आहे.

या पत्रावर प्रदिप झणझणे, गजानन बागडे, जालिंदर कोळेकर, आनंदा बागडे, विशाल कोळेकर, योगेश बागडे, माणिकराव भाईटे, विजय ढमाळ, कुंडलिक भगत, मारुती कोळेकर नाना मोहन कोळेकर नामदेव सुदाम कोळेकर, नवनाथ शिवाजी गुंजवटे आदी शेतकरी बांधवांनी या पत्रावर सह्या केल्या आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button