फत्तेसिंह माने पाटील व खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यात राजकीय समीकरणाचा गनिमी कावा ठरला….
विरोधकांची जिरवली म्हणणाऱ्या नेत्यांची जिरवणाऱ्या खऱ्या सिंहांचा माने पाटील यांच्याकडून सन्मान संपन्न झाला.
अकलूज (बारामती झटका)
सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अकलूज नगरीचे ज्येष्ठ नेते फत्तेसिंह माने पाटील परिवार व माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी माने पाटील परिवाराची भेट घेऊन भविष्यातील राजकीय समीकरणाचा गनिमी कावा ठरवलेला आहे. गतवेळच्या निवडणुकीत लगीन लोकांचं, नाचतंय येड्या भो****च, अशी परिस्थिती निर्माण होऊन अकलूज बागेवाडी येथे विरोधकांची जिरवली असे फलक लावलेले होते. विरोधकांची जिरवली म्हणणाऱ्या नेत्यांची खऱ्या अर्थाने जिरवणाऱ्या सिंहाचा माने पाटील यांच्याकडून सन्मान संपन्न झाला आहे.
गतवेळाच्या लोकसभा निवडणुकीत खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्यात लढत झालेली होती. राष्ट्रवादीचे उमेदवार संजयमामा शिंदे यांच्या समवेत होते. सदरच्या निवडणुकीत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा विजय झालेला होता. त्यावेळेला अकलूज, आनंदनगर, बागेची वाडी परिसरात विरोधकांची जिरवली, असे फलक लावून माने पाटील यांचे मानसिक खच्चीकरण केलेले होते. उगवलेला सूर्य मावळतो, त्याप्रमाणे माने पाटील यांचे खच्चीकरण करणाऱ्यांचा सूर्य अस्ताकडे जात आहे.
लोकसभा निवडणुकीत चित्र स्पष्ट होत आहे. विरोधकांची जिरवली म्हणणाऱ्या नेत्यांची जिरवणाऱ्या खऱ्या सिंहाच्या पाठीमागे माने पाटील परिवार खंबीरपणे उभा राहणार आहे. फत्तेसिंह माने पाटील यांनी अकलूज ग्रामपंचायत निवडणुकीत पुतण्या गिरीराज माने पाटील यांना निवडून आणून माने पाटील यांची ताकद दाखवून दिलेली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीवेळी परिवारातील सदस्य सोडले तर राजकीय दबावापोटी कोणीही नव्हते. तरीसुद्धा गनिमी काव्याने फत्तेसिंह माने पाटील परिवारांनी गड पार केलेला होता. महाराष्ट्रामध्ये अकलूज ग्रामपंचायतीच्या विजयाची चर्चा झालेली होती. त्यावेळेस लावलेले बोर्ड अकलूज, आनंदनगर व बागेची वाडी परिसरातील लोकांनीच पाहिलेले होते.
यंदाच्या निवडणुकीत माने पाटील परिवार यांनी खंबीरपणे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी ठाम राहून पुनश्च माढा लोकसभेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी दिल्लीला पाठवायचं, असं माने पाटील यांचं ठरलं आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.