ताज्या बातम्याशैक्षणिक

फिनिक्स इंग्लिश स्कूलमध्ये रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा.

संग्रामनगर (बारामती झटका) (केदार लोहकरे यांजकडून)

बहीण भावाच्या अतूट नात्याची, प्रेमाची जपणूक करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. देशभरात सर्वत्र मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला जातो. बहिण भावाचा हा सण लवंग २५/४ येथील फिनिक्स स्कूलच्या चिमुकल्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला.

मुलींनी स्वतः आपल्या हाताने फुले, लोकर, रेशमी धागे, कापूस, रंगीत तांदूळ, मणी अशा गृहोपयोगी वस्तूंचा वापर करून शाळेतील भावांसाठी अतिशय सुंदर मनमोहक अशा राख्या बनवून आपल्या भावाचे तोंड गोड करीत मनगटावर राख्या बांधल्या. तर भावांनीही आपल्या बहिणींसाठी चॉकलेट्स, पेन्सिल, पेन, बांगड्या, टिकली पॉकेट देऊन भावाचे कर्तव्य बजावण्याची परंपरा जोपासली.

या उपक्रमामुळे मुलींच्या सुप्त गुणांना वाव मिळाला. कार्यानुभव अंतर्गत मुलींच्या कलेला संधी मिळाली. मुलींनी स्वतः राख्या बनविल्यामुळे मुलींच्या चेह-यावर वेगळाच आनंद दिसत होता. हा उपक्रम राबविण्यासाठी फिनिक्स इंग्लिश स्कूलच्या संस्थापिका, अध्यक्षा नूरजहाँ शेख, गुलशन शेख, तमन्ना शेख यांनी परिश्रम घेतले व पालक संघाचे उपाध्यक्ष महादेव कोळेकर यांनी विद्यार्थ्यांना पेढे वाटून या रक्षाबंधनाचा गोडवा वाढवीला.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

8 Comments

  1. Business dicker You’re so awesome! I don’t believe I have read a single thing like that before. So great to find someone with some original thoughts on this topic. Really.. thank you for starting this up. This website is something that is needed on the internet, someone with a little originality!

Leave a Reply

Back to top button