फिनिक्स इंग्लिश स्कूलमध्ये “आपले घर” या उपक्रमात मुलांनी आकर्षक घरे तयार केली.
अकलूज (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील २५/४ लवंग येथील फिनिक्स इंग्लिश स्कूल मधील चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी “आपले घर” हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात बालकांनी आपल्या कल्पक बुद्धीचा सुरेख वापर करून सुंदर घरांच्या प्रतिकृती निर्माण केल्या. शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबर लहान मुलांच्या अंगातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्या बुद्धीला चालना मिळावी या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.
मुलांनी रंगीत कागद, रंग व छापडीचा वापर करत एकापेक्षा एक घरांची व बंगल्यांची प्रतिकृती साकारली. यामध्ये मुलांनी शेतातील घराच्या परिसरात रस्ते, चारा खाणाऱ्या गाई, गुरे, झाडे, फुले, कोंबड्या, घरावर उड्या मारणारी माकडे, शेतात राबणारा शेतकरी, दाणे टिपणारे पक्षी, झोका खेळणारी मुले, अंगणातील तुळस, दुचाकी, चारचाकी वाहनांचे घराभोवती पार्किंग अशा सुंदर घरांच्या प्रतिकृती तयार केल्या आहेत.
हा उपक्रम फिनिक्स इंग्लिश स्कूलच्या प्रिन्सीपल नूरजहाँ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. त्यांना रणजित चव्हाण, गुलशन शेख, तमन्ना शेख यांचे सहकार्य लाभले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.