ताज्या बातम्याराजकारण

फोंडशिरस गावात होलार समाजाचे युवा नेते कृष्णा ढोबळे यांच्या भाजप प्रवेशाने आ. उत्तमराव जानकर गटाला डोबळा पडला..

आ. उत्तमराव जानकर यांना खांद्यावर उचलून घेणाऱ्या कृष्णा ढोबळे यांच्या मा. आ. राम सातपुते यांनी खांद्यावर दिली भाजपची धुरा….

फोंडशिरस (बारामती झटका)

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या श्रीराम बंगला निवासस्थानी फोंडशिरस गावचे सरपंच भाजपचे ज्येष्ठ नेते पोपटराव बोराटे व नातेपुते भाजप मंडल ओबीसी अध्यक्ष सुनीलजी गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली फोंडशिरस ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या सौ. रुक्मिणी हनुमंत ढोबळे यांचे चिरंजीव व होलार समाजाचे युवा नेते कृष्णा हनुमंत ढोबळे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलेला असल्याने आमदार उत्तमराव जानकर गटाला डोबळा पडलेला आहे.

फोंडशिरस गावामध्ये आल्यानंतर उत्तमराव जानकर यांना खांद्यावर उचलून घेणाऱ्या कृष्णा ढोबळे यांच्या माजी आमदार राम सातपुते यांनी खांद्यावर भाजपची धुरा दिली. त्यामुळे फोंडशिरस गावामध्ये भारतीय जनता पक्षाच्या ताकदीमध्ये वाढ होणार आहे.

भाजप पक्ष प्रवेशवेळी भाजपा नातेपुते मंडल अध्यक्ष संजयजी देशमुख, उपाध्यक्ष हरिभाऊ पालवे पाटील, फोडशिरसचे सरपंच पोपटराव बोराटे, उपसरपंच दादा रणदिवे, भाजपा नातेपुते मंडल ओबीसी अध्यक्ष सुनीलजी गोरे, उमाजी बोडरे, शिवाजी सर्जे, मनोज जाधव, हरिदास पाटील, हेमंत बोडरे, बजरंग ढोबळे, तेजस गोरे, मनोज राऊत, सौ. शैलजा वाघमोडे, आदींसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom