फोंडशिरस येथे कृषीदूतांकडुन अनोख्या पद्धतीने राष्ट्रीय डाॅक्टरस् दिन संपन्न

फोंडशिरस (बारामती झटका)
फोंडशिरस येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिर येथे राष्ट्रीय डाॅक्टरस् दिन दि. ०१ जुलै आरोग्य सेवकांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी अकलूज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, प्राचार्य आर. जी. नलावडे, प्रा. एस. एम. एकतपुरे, प्रा. एम. एम. चंदनकर, प्रा. एच. व्ही. कल्याणी यांचे मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रमाचे आयोजन आदित्य कारकले, प्रतिक बिरादार, तानाजी बिराजदार, अली शेख, अजिंक्य कांबळे, रोहित शिंदे, गणेश सुरवसे, करण जाधव या कृषिदूतांनी केले होते. या कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी डॉ. सुमित्रा कुरूळे, औषधनिर्माण अधिकारी श्री. प्रशांत घुंबरे, अमोल शेंडगे, सौरभ रानधवन, अभिजित शिंदे तसेच इतर आरोग्यसेवक उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



