फोंडशिरस येथे ‘कृषिदुतांकडून’ शेतकऱ्यांना माती परीक्षणाबाबत मार्गदर्शन

फोंडशिरस (बारामती झटका)
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित व रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज संचलित ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचे आयोजन फोंडशिरस (ता. माळशिरस) येथे करण्यात आले. यादरम्यान महाविद्यालयातील ‘कृषिदूत’ आदित्य कारकले याने शेतकऱ्यांना माती परीक्षणाबाबत सविस्तर माहिती दिली. पीक उत्पन्नात मोठी घट होत असून यामुळे जमिनी नापीक होत चालल्या असून यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून घेणे गरजेचे आहे. यामुळे जमिनीत कोणते घटक कमी व जास्त आहेत, याची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली.
सदर कार्यक्रमाचे आयोजन प्रतिक बिरादार, रोहित शिंदे, गणेश सुरवसे, अली शेख, करण जाधव, अजिंक्य कांबळे, तानाजी बिराजदार, आदित्य कारकले यांनी केले होते. यावेळी अक्षय सुभाष शेंडे, बापू शेवते, तात्या काळे, सुखा मुंडे आदीसह शेतकरी उपस्थित होते. यासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील, प्राचार्य आर. जी. नलावडे, प्रा. एस. एम. एकतपुरे, प्रा. एम. एम. चंदनकर, प्रा. एस. आर. अडत यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी प्रतिक बिराजदार यांनी आभार मानले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
of course like your website but you have to check the spelling on several of your posts A number of them are rife with spelling issues and I in finding it very troublesome to inform the reality on the other hand I will certainly come back again
Magnificent beat I would like to apprentice while you amend your site how can i subscribe for a blog web site The account helped me a acceptable deal I had been a little bit acquainted of this your broadcast offered bright clear idea
खूपच उत्तम! फोंडशिरस येथे आयोजित ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाने शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले आहे. आदित्य कारकले यांचा तपशीलवार माहितीने शेतकऱ्यांना जमिनीतून कमी-जास्त घटकांचा सखोल अभ्यास करण्यास मदत होईल. पीक उत्पादनात घट होणं हे एक गंभीर समस्या आहे, आणि माती परीक्षण ह्या समस्येचा प्रभावी उपाय आहे. आयोजकांचे आणि मार्गदर्शकांचे मनःपूर्वक आभार!
KitchenDraw Download With latest Version