फोंडशिरस येथे माळी समाज बांधवांच्या लाड उत्सवानिमित्त सालाबाद प्रमाणे भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान संपन्न होणार…

फोंडशिरस (बारामती झटका)
फोंडशिरस ता. माळशिरस, येथे माळी समाज बांधवांच्या लाड उत्सवानिमित्त समस्त माळी समाज फोंडशिरस, महात्मा फुले समता परिषद फोंडशिरस, क्रांतीसुर्य प्रतिष्ठान फोंडशिरस यांच्यावतीने भव्य निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन सोमवार दि. १७/०३/२०२५ रोजी दुपारी ४ वाजता बाणलिंग आखाडा, फोंडशिरस येथे करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख उपस्थितीत ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे, माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माळशिरस विधानसभेचे आमदार उत्तमराव जानकर, माढा लोकसभेचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माळशिरस विधानसभेचे माजी आमदार राम सातपुते, विधान परिषदेचे आमदार योगेश आण्णा टिळेकर, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील आदी मान्यवर असणार आहेत. भव्य निकाली कुस्तीच्या मैदानाबरोबरच दिलबरा या मनोरंजनपर कार्यक्रमाचे ही आयोजन यावेळी करण्यात आले आहे.
या भव्य निकाली कुस्ती कुस्त्यांच्या जंगी मैदानामध्ये महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान विष्णू गोरे, फोंडशिरस चे सरपंच पोपट बोराटे, सुभाष गोरे, सुनील गोरे यांच्या वतीने इनाम रुपये १ लाख रुपयांसाठी पै. प्रसाद सस्ते मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र, पुणे विरुद्ध पै. समीर शेख हनुमान आखाडा, पुणे यांच्यात लढत होणार आहे. फोंडशिरसचे माजी सरपंच सावता ढोपे, विकास सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी गोरे, उद्योगपती विजयराव हेळकर, प्रगतशील बागायतदार सदाशिव गोरे यांच्या वतीने इनाम रुपये १ लाख रुपयांसाठी पै. जमीर मुलाणी वस्ताद भालचंद्र पाटील यांचा पठ्ठा, फोंडशिरस विरुद्ध पै. श्रीमंत भोसले इचलकरंजी यांच्यात लढत होणार आहे.
माजी सरपंच संपत ढोपे, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य बापू गोरे, कुंडलिक ढोपे यांच्यावतीने इनाम रुपये ७५ हजार रुपयांसाठी पै. सतीश खरात, सदाशिवनगर विरुद्ध पै. संतोष पडळकर मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र, पुणे, कै. शिवाजी गोरे यांच्या स्मरणार्थ इनाम रुपये ५१ हजार रुपयांसाठी पै. दत्ता बोडरे निमगाव (म.) पवार तालीम विरुद्ध पै. सागर देवकाते निमगावकेतकी, श्री. माऊली महाराज, सयाजीराजे विकास सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन मारुती गोरे, प्रगतशील बागायतदार बाळू गोरे यांच्या वतीने इनाम रुपये ३१ हजार रुपयांसाठी पै. दत्ता गोरे वस्ताद भालचंद्र पाटील यांचा पठ्ठा, फोंडशिरस विरुद्ध पै. वैजनाथ गोरड, माळशिरस, पै. कुंडलिकदादा गोरे यांच्या स्मरणार्थ इनाम रुपये २१ हजार रुपयांसाठी पै. पवन सरगर, सदाशिवनगर विरुद्ध पै. शुभम भोंग निमगावकेतकी सचिन बनकर यांचा पठ्ठा यांच्यात लढत होणार आहे.
तसेच यावेळी उद्घाटनाची कुस्ती पै. कुणाल कुदळे वस्ताद भालचंद्र पाटील यांचा पठ्ठा, फोंडशिरस विरुद्ध पै. माऊली काळे, सदाशिवनगर आणि पै. सार्थक शेंडे, सदाशिवनगर विरुद्ध पै. अतुल मसुगडे, नातेपुते यांच्यात लढत होणार आहे.
या कुस्त्यांसह अनेक आकर्षक कुस्त्या या भव्य जंगी कुस्ती मैदानात होणार आहे. सदर कुस्ती मैदानाचे निवेदन पै. हनुमंत शेंडगे आणि अनिकेत कदम हे करणार आहेत. या मैदानाच्या अधिक माहितीसाठी पै. विष्णू गोरे (९४२३३२८६४२), पै. कैलास गोरे (७५१७६९७६१७), पै. दिलीप पवार (७०३८४९८३३४), पै. संदीप बोराटे (९५२७५०९९३९), पै. दीपक गोरे (८३९०२६८८७४), पै. प्रशांत शेंडे (९७६६३५५०७५), पै. सागर शेंडे (८३९०२६८८७४), पै. अक्षय गोरे (९९७५२३२७९९) यांच्याशी संपर्क साधावा.
तरी मल्लसम्राट, कुस्ती शौकीन आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.