पिलीव मंडलमध्ये श्री प्रभू रामचंद्रजींच्या प्रतिष्ठापणेनिमित्त अयोध्या येथुन आलेल्या अक्षदा कलशाच्या शोभायात्रेची जय्यत तयारी

पिलीव (बारामती झटका) रघुनाथ देवकर यांजकडून
अखंड जगाला ज्याची उत्सुकता लागलेली आहे, पाचशे वर्षांपूर्वीपासून श्री प्रभू रामचंद्रजी अयोध्येच्या श्रीराम मंदिरामध्ये मूर्तीच्या स्वरूपात विराजमान झालेल्या क्षणाची अतिशय आतुरतेने अखंड मानव जातीमध्ये एक मोठी आतुरता आहे, तो क्षण येत्या २२ जानेवारी २०२४ रोजी येत आहे. हा आपल्या मानव जातीसाठी प्रत्येकाच्या जीवनाच्या इतिहासातील सोनेरी असणारा हा क्षण आहे. आणि त्या क्षणाचे, उत्सवाचे प्रत्येकजण मोठ्या कौतुक भरल्या नजरेने साक्षिदार होणार आहेत.
त्याच्यासाठीच उत्सवाच्या निमित्ताने गल्लोगल्ली, गावोगावी व महानगरामध्ये जय्यत तयारी सुरू आहे. त्याचप्रमाणे पिलीव मंडलमध्येही घराघरांतून बालकांपासून ते युवकांपर्यंत व युवकांपासून वृद्धांपर्यंत हर्षभरीत उत्साहाने सर्व रामभक्त कामाला लागल्याचे चित्र दिसून येत आहे. यासाठी पिलीव मंडलची नियोजन मीटिंग श्री शिवपार्वती (महादेव) मंदिरामध्ये आयोजित केली होती. त्या अनुषंगाने शनिवार दि. ३० डिसेंबर २०२३ रोजी पिलीव नगरीमधून सर्व महिला, पुरुष, युवक, युवती व तमाम श्रीराम भक्तांनी सकाळी ९ वा. मुख्य पेठेतून शोभा यात्रेच्या स्वरूपातून अक्षदा व कलश यांची जंगी मिरवणूक निघणार असल्याचे संयोजकांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी सर्व संघटना, तरुण मंडळे, महिला मंडळे तसेच सर्व जातीधर्मातील व्यक्तींचा समावेश दिसून येत आहे.

“साधुसंत येती घरा, तोची दिवाळी दसरा” या म्हणीप्रमाणे पिलीव व परिसरात प्रत्येकजण या कार्यक्रमाच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. दीपावली सणाप्रमाणे प्रत्येकाने आपल्या दारासमोर सडामार्जन, रांगोळी यांचे व भगवे झेंडे लावणे अशा प्रकारचे नियोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्याप्रमाणे परिसरात सर्व जय्यत तयारीही दिसत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.