ताज्या बातम्यासामाजिक

महाळुंग येथे वारकऱ्यांच्या ट्रकला अपघात, पुणे, पिंपरी चिंचवड येथील 20 वारकरी जखमी

अकलूज (बारामती झटका)

आषाढी एकादशीला विठुरायाचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघालेल्या वारकऱ्यांचा ट्रक महाळुंग, ता. माळशिरस येथे रस्त्याकडेच्या चारिमध्ये पलटल्याने सुमारे 20 वारकरी जखमी झाले आहेत.

पाषाण (पुणे) येथील ट्रक क्र. MH 12 EQ 0711 हा आज गुरुवार दि. 18 जुलै रोजी पंढरपूर येथून पुणेच्या दिशेने निघाला असता महाळुंग येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या चारित पलटला.

या अपघातात प्रियांका सूरज डोळस (फुगेवाडी), अंकिता अंकुश मुसळे (पाषाण), सुमन संजय कारखानीस (पिंपळे गुरव), मारुती आनंदराव घुगे (पिंपळे गुरव), उषा नागनाथ कदम (लोणी काळभोर), ज्ञानबा अमोल कदम (लोणी काळभोर), रुक्मिणी पांडुरंग चांदणे (लोणी काळभोर), विमल सदाशिव कोनवळे (वडगाव धायरी), गणेश रोहिदास शेलार (फुगेवाडी), रमेश प्रभाकर एरंडे (वडगाव धायरी), सुमन काशिनाथ कदम, सखुबाई अजिनाथ चिंचोळकर (वडगाव धायरी), सीता पोपट कदम (वडगाव धायरी), अंकुश मुरलीधर शिंगटे (वडगाव धायरी), तुकाराम शिंगटे (हडपसर), विमल महादेव कदम (गोकुळ नगर), नरहरी परमेश्वर गायकवाड (धायरी), वंदना भुजंग मेदाल (वडगाव धायरी), उज्वला सुनील रामखंडे (पिंपळे गुरव) सर्वजण रा. पुणे, हे वारकरी जखमी झाले आहेत.

सदर जखमींवर अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button